एक्स्प्लोर

Pune News : कुस्तीचा सराव करत होता, अचानक ह्रदयविकाराचा झटका आला; महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान स्वप्निल पाडाळेने लाल मातीतच सोडला प्राण

लाल मातीत कुस्तीचा सराव करत असताना पैलवानाचा (wrestler) हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) मृत्यू (Death) झाला आहे. लाल मातीच्या आखाड्यातच कुस्ती पैलवानाने अखेरचा श्वास घेतला.

Pune News : लाल मातीत कुस्तीचा सराव करत असताना पैलवानाचा (wrestler) हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) मृत्यू (Death) झाला आहे. लाल मातीच्या आखाड्यातच कुस्ती पैलवानाने अखेरचा श्वास घेतला. स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे (Swapnil Padale) असं या पैलवानाचं नाव आहे. ही दुर्दैवी घटना पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. पैलवानाच्या (Pune News) अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान स्वप्निल पाडाळे हा महाराष्ट्र चॅम्पियन होता.  बुधवारी सकाळी मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत ही दुर्दैवी घटना घडली.  स्वप्निलच्या आकस्मिक जाण्याने त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. सध्या तरुणांचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. शारीरिक आणि मानसिक तणावामुळे हृदयविकाराच्या झटका येऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तरीही तरुणांनी स्वत:च्या जीवनशैलीकडे लक्ष द्यायला हवं आणि जीवनशैलीत सुधारणा करायला हवी, असा सल्ला हॉक्टर देतात. 

नेमकं काय घडलं?

मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान स्वप्निल पाडाळे नेहमीप्रमाणे मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करत होता. पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे तो देखील व्यायाम करत होता. व्यायाम करत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो खाली पडला. स्वप्निल अचानक खाली पडल्याचे पाहून तालमीतील इतरांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. अचानक झालेल्या मृत्यूमुळे तालमीत गोंधळ निर्माण झाला होता. तरुण मुलगा गेल्याने पाडाळे कुटुंबियांवर दुख:चा डोंगर पसरला आहे.


तरुणांनी हृदय जपलं पाहिजे... 

खरे तर सध्या धावत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी वयाच्या लोकांनाही हृदयविकाराचा त्रास जाणवतो. चुकीचा आहार, शारीरिक हालचाली कमी होत असल्याने हृदयविकाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. चुकीच्या सवयींमुळे हृदयाला रक्तपुरवठा करण्याऱ्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात आणि हृदयविकाराचा त्रास वाढत जातो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होऊ शकतो. अलीकडे तरुणांना हृदयविकाराचा धोका वाढता असल्याचं निष्पन्न झालं आहे. विशीमध्ये आणि तिशीमध्येही तरुणांना हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यासाठी त्यांची चुकीच्या पद्धतीची जीवनशैली कारणीभूत आहे. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, धूम्रपानामुळे तरुणांमध्ये हृदयविकार वाढत आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget