एक्स्प्लोर

Pune News: पुण्यात भारत आणि 24 आफ्रिकी देशांच्या सैन्यदलांचा लष्करी सरावाला दणक्यात सुरुवात

भारत आणि आफ्रिका खंडातील 23 राष्ट्रांच्या दुसऱ्या संयुक्त क्षेत्र प्रशिक्षण (फिल्ड ट्रेनिंग) (AFINDEX- 2023) सरावाला पुणे येथील औंध मधील परदेशी प्रशिक्षण विभागात सुरुवात झाली.

Pune News :  भारत आणि आफ्रिका खंडातील 23 राष्ट्रांच्या दुसऱ्या संयुक्त क्षेत्र प्रशिक्षण (फिल्ड ट्रेनिंग) (AFINDEX- 2023) सरावाला पुणे येथील औंध मधील परदेशी प्रशिक्षण विभागात सुरुवात झाली. या प्रशिक्षण सरावात इथिओपिया, घाना, केनिया, लेसोथो, निजर, सेशेल्स, टांझानिया, युगांडा, झांबिया, बोत्सवाना, कॅमेरून, काँगो, इजिप्त, इस्वाटिनी/स्वाझीलंड, मलावी, नायजेरिया, रवांडा, सेनेगल, झिम्बाब्वे आणि मोरोक्को या राष्ट्रांच्या तुकड्या आणि  प्रतिनिधी  सहभागी होत आहेत. 

हा संयुक्त सराव, भारत आणि आफ्रिका यांच्यात 2008 मध्ये झालेल्या भारत-आफ्रिका शिखर परिषदेनंतर आफ्रिकेशी अधिकाधिक संपर्क कायम राखण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा भाग आहे. 2019 नंतर तो यावर्षी आयोजित करण्यात आला आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून भुसुरूंग निकामी करणे आणि शांतता प्रस्थापित करणे ही या सरावाची संकल्पना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता कायम राखण्याच्या कार्यात  कार्यक्षमता आणि सज्जता यांच्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने सहभागी राष्ट्रांमधील लष्करी सहकार्य  महत्वपूर्ण आहे.

सरावाचा उद्देश काय?

शांतता आणि सुरक्षेत वाढ करण्यासाठी लक्ष केंद्रीत करणे, नवनवीन कल्पना आणि अभिनव दृष्टिकोन यांची देवाणघेवाण करणे, सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यातील व्यवस्थापनाविषयी आफ्रिकेच्या अनुभवांचे अवलोकन  करणे आणि या उपक्रमांमधून भारत-आफ्रिका यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणे  हा या सरावाचा उद्देश आहे.

किती टप्प्यात होणार सराव?

हा सराव चार टप्प्यात विभागण्यात आला आहे. आरंभी, प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण दिले गेले. त्यानंतरच्या टप्प्यात  आता मानवतावादी दृष्टिकोनातून भुसुरूंग विरोधी कारवाई करणे आणि शांतता प्रस्थापित करणे यासंबंधी प्रशिक्षण दिले जाईल, तर अंतिम टप्प्यात या सर्व  प्रशिक्षणाच्या परिणामांची फलनिष्पत्ती समजण्यासाठी मूल्यमापन केले जाईल. सामरिक कवायती आणि  कारवाई संयुक्तपणे करण्याची क्षमता हा या संयुक्त सरावाचा महत्वाचा मुद्दा आहे.

याबरोबरच 28 ते 30 मार्च 2023 या कालावधीत लष्कर प्रमुखांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दरम्यान हे  लष्कर प्रमुख संयुक्त  सरावाची पाहणी करतील. सरावा दरम्यान स्वदेशी उपकरणांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला जाईल. या सरावात भारतात उत्पादित झालेली अत्याधुनिक उपकरणे प्रदर्शित केली जातील. ज्यामुळे सहभागी राष्ट्रांच्या सैन्याला त्यांच्या कार्यक्षमतेचा अनुभव येईल. या सरावामुळे आफ्रिका आणि भारतामधील प्रादेशिक ऐक्य वाढीस लागेल  तसेच सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास (SAGAR) हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले जाईल.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price: सणा सुदीच्या मुहूर्तावर पुन्हा ग्राहकांना झटका, सोनं चांदी झालं महाग, कोणत्या शहरात किती दर? 
सणा सुदीच्या मुहूर्तावर पुन्हा ग्राहकांना झटका, सोनं चांदी झालं महाग, कोणत्या शहरात किती दर? 
RBI : मोठी बातमी! देशातील दोन बड्या बँकांना RBI चा दणका, कोट्यावधी रुपयांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?
RBI : मोठी बातमी! देशातील दोन बड्या बँकांना RBI चा दणका, कोट्यावधी रुपयांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?
Malaika Arora Father Death : कोण होते अनिल अरोरा? मलायका 11 वर्षांची असताना झाला होता आई-वडिलांचा घटस्फोट
कोण होते अनिल अरोरा? मलायका 11 वर्षांची असताना झाला होता आई-वडिलांचा घटस्फोट
Onion Price : कांद्याची घोडदौड, बळीराजाला दिलासा! सरकारकडून दर कमी करण्याचे प्रयत्न सुरुच, मात्र...
Onion Price : कांद्याची घोडदौड, बळीराजाला दिलासा! सरकारकडून दर कमी करण्याचे प्रयत्न सुरुच, मात्र...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01.00 PM  : 11 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Hit And Run Case | नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधितGondia Heavy Rainfall : गोंदियातील बांध तलाव ओव्हरफ्लो, नागरिकांच्या घरात शिरलं पाणी..VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price: सणा सुदीच्या मुहूर्तावर पुन्हा ग्राहकांना झटका, सोनं चांदी झालं महाग, कोणत्या शहरात किती दर? 
सणा सुदीच्या मुहूर्तावर पुन्हा ग्राहकांना झटका, सोनं चांदी झालं महाग, कोणत्या शहरात किती दर? 
RBI : मोठी बातमी! देशातील दोन बड्या बँकांना RBI चा दणका, कोट्यावधी रुपयांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?
RBI : मोठी बातमी! देशातील दोन बड्या बँकांना RBI चा दणका, कोट्यावधी रुपयांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?
Malaika Arora Father Death : कोण होते अनिल अरोरा? मलायका 11 वर्षांची असताना झाला होता आई-वडिलांचा घटस्फोट
कोण होते अनिल अरोरा? मलायका 11 वर्षांची असताना झाला होता आई-वडिलांचा घटस्फोट
Onion Price : कांद्याची घोडदौड, बळीराजाला दिलासा! सरकारकडून दर कमी करण्याचे प्रयत्न सुरुच, मात्र...
Onion Price : कांद्याची घोडदौड, बळीराजाला दिलासा! सरकारकडून दर कमी करण्याचे प्रयत्न सुरुच, मात्र...
Precious stones : आयुष्यभर जपलं, पण मृत्यूनंतर कळलं! आजीबाईंच्या अंगणात होता 9 कोटींचा दगड 
Precious stones : आयुष्यभर जपलं, पण मृत्यूनंतर कळलं! आजीबाईंच्या अंगणात होता 9 कोटींचा दगड 
Gitanjali Express : मोठी बातमी! गीतांजली एक्सप्रेसमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Gitanjali Express : मोठी बातमी! गीतांजली एक्सप्रेसमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Sushma Andhare: 'अजून 5-50 जीव गेले तरी काय फरक पडतो?', नागपुरातील खून प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
'अजून 5-50 जीव गेले तरी काय फरक पडतो?', नागपुरातील खून प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
20 मिनिटात 10 एकर शेतीची फवारणी, भंगारातून घरीच बनवलं अनोखं मशीन, तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग 
20 मिनिटात 10 एकर शेतीची फवारणी, भंगारातून घरीच बनवलं अनोखं मशीन, तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग 
Embed widget