एक्स्प्लोर

Pune News : कॉंग्रेस नेते अन् नागरिक एकमेकांवर भिडले; पुणे महापालिकेसमोर नक्की काय घडलं?

रोजच्या समस्यांनी ग्रासलेले पुणेकर महापालिकेसमोर आक्रमक झाले आहे. यावेळी कॉंग्रेसचे नेते अरविंद शिंदे आणि त्रस्त नागरिक आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Pune News : रोजच्या समस्यांनी ग्रासलेले पुणेकर महापालिकेसमोर आक्रमक (pune) झाले आहे. यावेळी कॉंग्रेसचे नेते अरविंद शिंदे आणि त्रस्त नागरिक आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. विविध मागण्यासाठी नागरिकांनी पालिकेला घेराव घातला होता. 

नेमकं काय घडलं?

विविध मागण्यासाठी पुणेकर नागरिकांनी पालिकेला घेराव घालण्याचं ठरवलं होतं. त्यांच्याकडून विविध घोषणाबाजी करण्यात येत होती. याचवेळी कॉंग्रेसचे नेते आणि पदाधिकारी या नागरिकांना दिसले. त्यावेळी आंदोलन करत असलेल्या एका व्यक्तीने राजकारण्यांनी या ठिकाणी आपली पोळी भाजू नये, अशी घोषणा केली. त्यावेळी कॉंग्रेसचे नेते आणि पदाधिकाही काही प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काही वेळानंतर नागरिक आणि कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये हाणामारी झाली.

चलो पीएमसी या उपक्रमांतर्गत महापालिका आयुक्तांना जाब विचारायला पुणेकर पीएमसी एकत्र आले होते. पुणेकर नागरिकांच्या दैनंदिन समस्यांमध्ये ट्रॅफिक जॅम आणि त्यामुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण, अत्यंत तोकडी पार्किंग व्यवस्था, कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, नदीमध्ये विना प्रक्रिया सोडले जाणारे सांडपाणी, त्या अनुषंगाने होणारे नदी प्रदूषण, तसेच नदीकाठ सुधारणा प्रकल्पाच्या नावाखाली नदीकाठची झाडे तोडणे, नदीमध्ये काँक्रिट टाकून रस्ते तयार करणे असे मानवी जीवनाला घातक ठरणारे प्रकल्प या सगळ्या मुद्द्यांवर जाब विचारण्यासाठी पुणेकर एकत्र आले होते.

या सर्व समस्यांकडे प्राधान्याने लक्ष द्यावं आणि त्यांचे निवारण करणे यासाठी महापालिकेकडे दहा हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद आहे आणि गेले वर्षभर अधिकार संपूर्णतः हाती असतानाही महानगरपालिका आयुक्त यांच्या देखरेखेखाली पुणेकरांच्या समस्या सुटलेल्या नाहीत किंबहुना त्यांच्यामध्ये वाढ झाली आहे, असं नागरिकांचं म्हणणं होतं. यासाठी  नागरिकांना थेट विश्वासात घेऊन पुढील कृती कार्यक्रम ठरवणे आणि त्याच्या अंमलबजावणीचा अहवाल ठराविक कालावधीमध्ये नागरिकांना देणे महापालिकेवर बंधनकारक करणे या नागरिकांच्या मागण्या होत्या.    

कचरा मुक्त पुणे, खड्डे मुक्त रस्ते, सुरळीत वाहतूक व्यवस्था, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त नदी, वाहनतळांची संपूर्ण शहरभर पुरेशी सुविधा, स्वच्छ, दर्जेदार आणि गतिमान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या पुणेकरांच्या मागण्यांसाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र नागरिकांमध्ये आणि कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या-

Pune Person Threatened: देशात बॉम्बस्फोट घडवणार, आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो; पुण्यातील एका व्यक्तीला ईमेलद्वारे धमकी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget