Pune Rape News : अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; पाच जणांना अटक
14 वर्षीय मुलीवर बलात्कार (rape) केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड (pcmc news) पोलिसांनी पाच जणांना अटक (Arrest) केली आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा बलात्कार (Rape) केला आहे.
Pune Rape News : 14 वर्षीय मुलीवर बलात्कार (rape) केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड (pcmc news) पोलिसांनी पाच जणांना अटक (Arrest) केली आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा बलात्कार (Rape) केला होता. आरोपींपैकी एकाचे मुलीशी सुरुवातीला शारीरिक संबंध (Physical relation) होते आणि त्याने तिला गर्भवती (Preagnant) केले, असा दावा पोलिसांनी केला आहे त्यानंतर आरोपीने पैसे कमावण्यासाठी पीडितेला या प्रकरणात सहभागी असलेल्या इतरांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या प्रकरणी पोलीस तपास करत होतो अखेर पोलिसांनी या नराधमांना जेरबंद केलं आहे.
पीडितेच्या पालकांनी तक्रार दाखल केली होती. आरोपींपैकी एकाने त्यांच्या मुलीशी चॉकलेट आणि इतर भेटवस्तू देऊन मैत्री केली आणि तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला होता. ज्यामुळे तिची गर्भधारणा झाली. त्यानंतर आरोपीने पैसे मिळवण्यासाठी पीडितेला इतरांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. गर्भधारणा झाल्यावर हा सगळा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. हिंजवडी पोलीस ठाण्यात अनेक कलमानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली होती. अनेकांनी या कृत्यावर संताप व्यक्त केला होता.
डिसेंबर महिन्यातही असाच प्रकार समोर
बालविवाह करणे हा गुन्हा असतानादेखील बालविवाह करुन दिल्याने 12 वर्षीय मुलगी गर्भवती राहिती होती. पुण्यातील चाकण परिसरातून ही घटना समोर आली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या पतीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण मे 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत खेड तालुक्यात घडला होता. या संदर्भात महिला कर्मचाऱ्याने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पीडित मुलीचा पती राहुल शिवाजी भले यांच्यावर पॉक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नराधमांना शिक्षा?
पुण्यात लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. रोज अनेक नवे प्रकरणं समोर य़ेत आहे. ही प्रकरणं रोखण्यासाठी शाळा आणि बाकी स्तरांवरुन अनेक योजना राबवल्या जात आहे. मात्र तरीही लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणं थांबत नसल्याचं समोर येत आहे. ही प्रकरणं रोखण्यासाठी शाळेत गुड टच बॅड टच वर्गही घेण्यात येत आहे. त्या वर्गातही अनेक मुली त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकारासंदर्भात बोलू लागल्या आहे. या वर्गाच्या माध्यमातून अनेक प्रकरणं समोर येत आहे. त्यामुळे अनेक नराधमांना शिक्षादेखील होत आहे.