एक्स्प्लोर

Pune Mhada News : पुण्यात घराचं स्वप्न पूर्ण करायचंय? म्हाडाच्या पाच हजार घरांची सोडत निघणार, कशी असेल अर्जाची प्रक्रिया?

म्हाडाकडून पाच हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. 26 सप्टेंबरपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे आता पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

पुणे : पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस (Mhada Pune) वाढत आहे. त्यामुळे पुण्यात घरांचीदेखील मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  पण आता पुणे शहरात कमी किमतीत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाकडून पुण्यासाठी पाच हजार घराची सोडत काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर व सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5 हजार 863 सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला असून 26 सप्टेंबरपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे.

म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील म्हणाले, म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली शहरातील 5 हजार 863 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 सप्टेंबर असून घरांची सोडत 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत आहे त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाईन सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्जाची छाननी देखील ऑनलाईन होणार आहे.

ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय मंडळातर्फे नागरिकांकरीता खुला राहणार आहे. नोंदणी केलेल्या अर्जदारांना 27 सप्टेंबर रोजी रात्री 12  वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती 28  सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे. 29 सप्टेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस, एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे.

कशी असेल प्रक्रिया?

सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील अर्जदारांना ऑनलाईन दावे, हरकती 12 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 

सोडतीत पुणे जिल्ह्यासाठी 5 हजार 425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यासाठी 69 सदनिका, सांगली जिल्ह्यासाठी 32 सदनिका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील  337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2 हजार 584 सदनिका आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2 हजार 445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

इतर महत्वाची बातमी-

Mhada Lottery: कर्ज मिळत नसल्याने भाजप आमदाराला म्हाडाचं साडेसात कोटीचं घर सोडावं लागलं

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget