एक्स्प्लोर

पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान

पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज चौथ्या टप्प्यात मतदान सुरु  झालं आहे. मात्र,  पुण्यातील भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आरोप प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेत नाही आहे.

पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा (Pune) मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हेही मैदानात उतरले आहेत. मात्र, मुख्य लढत ही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यातच होत आहे. पण, रविवार रात्रीपासूनच पुणे मतदारसंघात राडा पाहायला मिळत आहे. पैसेवाटपाचा आरोप करत उमेदवार धंगेकर यांनी चक्क पोलीस स्टेशन गाठले होते. तर, आज सकाळी मतदान केंद्रांवरही काही ठिकाणी अनुचित प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच, आता चक्क काँग्रेस शहराध्यक्षाच्या (Congress) नावावरच बोगस मतदान (Voting) झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. 

पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज चौथ्या टप्प्यात मतदान सुरु  झालं आहे. मात्र,  पुण्यातील भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आरोप प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेत नाही आहे.  भाजप पैसे वाटप करत आहेत, असं म्हणत काल रवींद्र धंगेकरांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर आता मतदानाच्या दिवशी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील कसबा पेठेतील फडके हौद चौकात भाजपचे कार्यकर्ते हेमंत रासनेंच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यातच, पुणे शहरासह मावळ आणि शिरुर मतदा संघातही काही ठिकाणी ईव्हीएम मशिनचा बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. तर, शिरुरमधील एका मतदान केंद्रावर मनमानी कारभार सुरू असल्याचा व्हिडिओच खासदार कोल्हे यांनी शेअर केला होता. त्यानंतर आता पुणे काँग्रेस शहराध्यांच्याचा नावाने बोगस मतदान झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 

पुण्यातील सेंट मीरा स्कुलमध्ये बोगस मतदान करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावरील हे मतदान ते मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच झाल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेनंतर अरविंद शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून ऑनलाईन तक्रारही केली आहे. 

काय म्हणाले अरविंद शिंदे

''मी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचलो, पण माझ्या नावावर रेड लाईन मारली होती, मला सांगितलं की तुमचं मतदान झालंय. माझ्या नावापुढे दुसऱ्याचाच शिक्का आणि सहीही वेगळीच असल्याचं दिसून आले. विशेष म्हणजे येथील आधारकार्डचा नंबरही माझा नव्हता. यावेळी पोलिंग एजंटने मध्ये बोलायचा प्रयत्न केला, तर तिथेही दमबाजी करण्यात आली, असे शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच, मी या मतदारसंघातून 4 वेळा नगरसेवक राहिलो आहे, येथील लोकं मला चांगलं ओळखतात. अरविंद तुकाराम शिंदे असं नाव घेतलं असतं तरीही मला ओळखलं असतं. मात्र, माझ्याच नावाने बोगस मतदान झाल्याचं उघडकीस आलंय. या घटनेनंतर बॅलेट पेपरवर चॅलेंज करुन मी टेंडर व्होट करुन आलोय. मी ऑनलाईन तक्रारही केली आहे, असे अरविंद शिंदे एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केले. 

ईव्हीएम गोडाऊनचे सीसीटीव्ही बंद?

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी 45 मिनिटे बंद पडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर, निवडणूक अधिकाऱ्यांनी बाजू मांडली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा काही वेळासाठी बंद होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलाय.मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे सीसीटीव्ही बंद नव्हते, असा दावा केलाय. केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दृष्ये ज्या स्क्रिनवर दिसतात ती स्क्रिन काही वेळासाठी बंद होती, असे स्पष्टीकरण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे. 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
Nashik Leopard Attack: पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
Parth Pawar Land Scam: व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Farmers' Protest : 'सडलेलं धान्य देऊन अधिकाऱ्यांचा सत्कार करा', Uddhav Thackeray यांचा शिवसैनिकांना आदेश
Uddhav Thackeray : बँकेच्या कर्जापायी जीव दिला, सरकारला जाब कोण विचारणार?
Shaktipeeth Scam: 'अजित पवारांच्या मुलाचा जमिनींमध्ये हात', Uddhav Thackeray यांचा गौप्यस्फोट
Pune Land Deal: 'शितल तेजवानीने २७२ जणांकडून कवडीमोल भावात जमिनी घेतल्या', पार्थ पवारांशी काय आहे संबंध?
Pune Land Scam: '९९% भागीदार असूनही Parth Pawar यांच्यावर गुन्हा का नाही?', असा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
Nashik Leopard Attack: पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
Parth Pawar Land Scam: व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Date: शुभ मुहूर्ताची सनई वाजली गं... रश्मिका, विजय देवरकोंडाच्या लग्नाची तारीख ठरली; आलिशाल राजवाड्यात शाही विवाहसोहळा?
शुभ मुहूर्ताची सनई वाजली गं... रश्मिका, विजय देवरकोंडाच्या लग्नाची तारीख ठरली; आलिशाल राजवाड्यात शाही विवाहसोहळा?
Amitabh Bachchan Sells Two Luxury Apartments: बिग बींनी रातोरात कमावला कोट्यवधींचा नफा; विकले मुंबईतील दोन जुने लग्झरी फ्लॅट्स, किती कोटींना झाली 'सुपर डील'?
बिग बींनी रातोरात कमावला कोट्यवधींचा नफा; विकले मुंबईतील दोन जुने लग्झरी फ्लॅट्स, किती कोटींना झाली 'सुपर डील'?
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
Embed widget