पीएमपी गतिरोधकावर आदळल्यानं मणका तुटला! पुण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
भरधाव वेगानं पीएमपी (Pune PMP Latest Update) चालवणं एका चालकाला चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यात भरधाव वेगात जाणारी पीएमपी बस जोरात आदळल्याने एका प्रवाशाच्या मणक्यात गॅप पडला आहे
पुणे : भरधाव वेगानं पीएमपी (Pune PMP Latest Update) चालवणं एका चालकाला चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यात भरधाव वेगात जाणारी पीएमपी बस जोरात आदळल्याने एका प्रवाशाच्या मणक्यात गॅप पडला आहे. या घटनेनंतर त्या प्रवाशानं सरळ पोलिस स्टेशन गाठलं आणि त्या चालकाविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी संबंधित चालकावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अस्लम कादर शेख असं गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. प्रवाशी राजू मोतीराम चिंचवडकर (वय 62) यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
राजू चिंचवडकर हे 27 नोव्हेंबर रोजी लोहगाव ते कात्रज या बसमधून प्रवास करत होते. बस कात्रज येथील सर्प उद्यानासमोर आली. यावेळी चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगात बस चालवली. समोर गतिरोधक असताना सुद्धा त्यानं ब्रेक न लावल्याने त्यावरून तशीच बस नेल्याने बस जोरात आदळली.
यामुळं फिर्यादी प्रवाशी राजू मोतीराम चिंचवडकर यांच्या मणक्यात गॅप पडला. या घटनेला चालकच जबाबदार असल्याचा तक्रार फिर्याद चिंचवडकर यांनी पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरु आहे.
या बातम्या देखील नक्की वाचा