एक्स्प्लोर
टायर किलर हटवा, पुणे पोलिसांची अॅमनोरा पार्कला नोटीस
चुकीच्या दिशेनं वाहनं चालवून अपघतांना निमंत्रण देणाऱ्या पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी, अॅमनोरा पार्कने टायर किलर बसवले होते.
पुणे: हडपसर वाहतूक पोलिसांनी अॅमनोरा पार्कला नोटीस पाठवली आहे. कोणतीही परवानगी न घेता टायर किलर्स बसवल्यानं, ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
चुकीच्या दिशेनं वाहनं चालवून अपघतांना निमंत्रण देणाऱ्या पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी, अॅमनोरा पार्कने टायर किलर बसवले होते.
मात्र कोणतीही परवानगी न घेता हे टायर किलर बसवल्याचा आक्षेप हडपसर पोलिसांनी घेतलाय. तसंच हे टायर किलर तातडीने हटवा, अन्यथा कारवाई करु, असं हडपसर वाहतूक पोलिसांनी अॅमनोरा पार्कला बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नियम मोडून, विरुद्ध बाजूने वाहने चालवणाऱ्यांवर जालीम उपाय म्हणून, पुण्यातील अॅमनोरा पार्कने टायर किलर बसवले. नियमानुसार आणि सरळ मार्गी येणाऱ्या वाहनांना याचा काहीही अडथळा होणार नाही. मात्र विरुद्ध दिशेने आल्यास, अणूकूचीदार टोक थेट टायरमध्ये घुसून, टायर फाटते. हेच टायर किलर अॅमनोरा पार्कने बसवले.
अॅमनोरा टाऊनशिपमध्ये शाळा, सतत रहदारी असते. तसंच राँग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे हे अपघात प्रवण स्थळ बनलं आहे. वारंवार लोकांना सांगूनही काही फरक पडत नव्हता. त्यामुळे इथे टायर किलर्स लावण्यात आले.
हे बसवण्याच्या आधी महिनाभर याविषयी लोकांना माहिती देण्यात आली होती, असं टाऊनशिपच्या व्यवस्थापक मंडळाचं म्हणणं आहे.
मात्र या टायर किलरला विरोध झाल्यामुळे आता ते काढण्यात येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement