एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात पाटील इस्टेटमधील झोपडपट्टीला भीषण आग
पुणे, पिंपरी चिंचवड, खडकी कॅन्टॉन्टमेंटमधील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
पुणे : पुण्यातील शिवाजीनगरमधल्या पाटील इस्टेट झोपडपट्टीतील गल्ली क्रमांक तीनमध्ये भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग नेमकी कशी लागली, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
आज दुपारी बारा ते एकच्या सुमारास झोपडपट्टीत आग लागली. दहा सिलेंडरच्या स्फोटामुळे आग भडकली. पुणे, पिंपरी चिंचवड, खडकी कॅन्टॉन्टमेंटमधील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. चिंचोळ्या गल्ल्या शिवाय घरं एकमेकांना खेटून असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचणी येत आहे.
आग लागल्यानंतर रहिवाशांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवलं असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत दोन ते तीन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु आगीत जवळपास 50 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. स्थानिक आमदारांनी रहिवाशांच्या राहण्याची-खाण्याची सोय केली आहे.
आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे. या झोपडपट्टीच्या जवळच जुना मुंबई-पुणे हायवे असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे. शिवाय स्थानिकांनी रस्त्यावर गर्दी केली आहे. आगीत सर्वस्व गमावल्याने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे.
दोन दिवसांपूर्वी याच झोपडपट्टीच्या गल्ली क्रमांक पाचमध्ये आग लागली होती. ज्यामध्ये चार ते पाच झोपड्या जळाल्या होत्या.
पुण्यात झोपडपट्टीला आग https://t.co/l4Peuqhvly pic.twitter.com/gBhKb9174m
— ABP माझा (@abpmajhatv) November 28, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement