एक्स्प्लोर
सासऱ्याला दारु आणून न दिल्याने सुनेला मारहाण करत कीटकनाशक पाजलं
हा प्रकार इथेच थांबला नाही तर तिने घर सोडून जावं म्हणून घरात असलेलं सदाबहार कीटकनाशक पाजून जीवे मारण्याचा प्रयत्नही केला.
पुणे : सासऱ्याला दारु आणून दिली नाही म्हणून सुनेला मारहाण करत, कीटकनाशक पाजल्याची घटना पुण्यातील आळंदीमध्ये घडली आहे. सुदैवाने या घटनेतून सून बचावली आहे. सुनेच्या सासू, सासरे आणि दोन नणंदांनी हा प्रताप केला आहे. सुनेच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 जानेवारी रोजी ही घटना घडली. आरोपी सासऱ्याने संध्याकाळी सुनेला दारु आणायला सांगितली. पण तिने नकार दिला. सुनेचा विरोधाने रागावलेल्या सासरे तिला शिवीगाळ करत हाताने आणि काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकारात सासू आणि दोन नणंदांनीही तिची साथ दिली.
हा प्रकार इथेच थांबला नाही तर तिने घर सोडून जावं म्हणून घरात असलेलं सदाबहार कीटकनाशक पाजून जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. या प्रकरणी काल (23 जानेवारी) आळंदी पोलीस स्टेशनमध्ये बाळू चौधरी, चंपा चौधरी, सुरेखा वाघोले, रेखा गव्हाणे या चौघांवर मारहाण आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement