Pune Crime news : माझी नाही तर, कोणाची होऊ देणार नाही; पुण्यात पुन्हा एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला
माझी नाही तर, कोणाची होऊ देणार नाही, असं म्हणत एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर हल्ला केला आहे. त्यामुळे पुण्यात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
Pune Crime News : तरुणी भेटत नसल्याच्या कारणाने (Pune Crime News) संतापलेल्या तरुणाने तरुणीवर हल्ला करत तिचं डोके फोडल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीचे डोके फोडले असून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यात 37 वर्षीय महिला जखमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून प्रेमातून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे, त्यामुळे पुणे खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जात आहे.
ही घटना बुधवारी (12 जुलै) संध्याकाळी सातच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील बर्निग घाट परिसरात घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. संकेत शहाजी म्हस्के असं 26 वर्षीय तरुणाचं नाव आहे. आरोपी संकेत आणि 37 वर्षीय महिला हे एकमेकांचे मित्र आहे. दोघेही एकाच परिसरात राहायला आहेत. काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडणं सुरू असल्याने महिला संकेत सोबत बोलत नव्हती. याचा राग संकेतच्या मनात होता. त्यामुळे संकेतने हल्ला केला.
तू मला भेटत का नाही, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझी होऊ शकत नाही, तर कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. मात्र, तरुणीने ‘माझे तुझ्यावर प्रेम नाही’, असे उत्तर दिले. त्यानंतर संकेतने तिच्या डोक्यावर मारहाण केली आणि त्यानंतर महिला घाबरली आणि खाली पडली. तेवढ्यात संकेतने अजून एक मारा केला आणि तिला धमकी दिली. यात महिला जखमी झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल करून आरोपी तरुण संकेतला अटक केली आहे.
पुण्यात महिला असुरक्षित?
पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात महिलाच असुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दर्शना पवार हत्या प्रकरण आणि त्यानंतर सदाशिव पेठेत भर रस्त्यात प्रेमातून कोयत्याने केलेल्या हल्ल्याने महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर महिलांवरील हल्ले आणि या सगळ्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र घटनांची संख्या कमी होताना दिसत नाही आहे. यातच पुन्हा एकदा हल्ला झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा-