Pune Crime News : 9 दिवसांनी सापडला कुजलेला मृतदेह; पुण्यातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचं कारणही समोर
आयटी अभियंता सौरभ पाटील हत्या प्रकरणात त्याच्या गावातीलच एकाला अटक करण्यात आली आहे. कोपरगावात या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी मोठा वाद झाला होता.
Pune Crime news : आयटी अभियंता सौरभ पाटील हत्या (Pune Crime News) प्रकरणात त्याच्या गावातीलच एकाला अटक करण्यात आली आहे. कोपरगावात या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी मोठा वाद झाला होता. त्यातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटकही केली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील खेड राजगुरुनगर घाटात 6 ऑगस्टला सौरभचा मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली. आयटी अभियंता सौरभ हा 28 जुलैपासून बेपत्ता होता. त्यानंतर जवळपास नऊ दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेहच आढळला. शरीरावर जखमांच्या खुणा देखील होत्या. त्यामुळे ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं होतं. पण सौरभची हत्या कोणी, का आणि कुठे केली? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. तेव्हा त्याच्याच कोपरगावातील एका तरुण या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचं निष्पन्न झालं.
सौरभ आणि या तरुणाचे एका प्रकरणावरुन वाद होते. काही महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये मोठी खडाजंगी झाली होती. त्यानंतर सौरभ हिंजवडीतील एका आयटी कंपनीत नोकरीला लागला. पण त्या भांडणाचे पडसाद असे आणि आता उमटतील याची त्याला कल्पनाही नसावी. पण या अटकेनंतर सौरभची हत्या कुठे आणि कशी केली? त्यासोबतच ते प्रकरण नेमकं कोणतं? या सर्वांचा खुलासा आज पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत.
सौरभ नंदलाल पाटील (वय 23 वर्षे) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. 28 जुलैपासून हा तरुण बेपत्ता होता. मात्र रविवारी त्याचा मृतदेह खेड घाटात सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. याबाबत सौरभ याचे नातेवाईक संदीप सोनावणे यांनी हिंजवडी पोलिसात हरवल्याची तक्रार देखील दिली होती. मात्र त्याचा मृतदेह पुणे-नाशिक महामार्गालत असलेल्या सांडभोरवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या शेतात आढळला होता.
कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
सौरभ पाटील हा हिंजवडी आयटी पार्क येथील एका कंपनीत कामाला होता. त्याची दुचाकी ही खेड तालुक्यातील होलेवाडी परिसरात आढळली होती. तसेच दुचाकीची चावी जवळ असलेल्या विहिरीच्या कठड्यावर आढळली होती. मात्र तरी देखील त्याचा शोध कुठे लागत नव्हता. अखेर पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या सांडभोरवाडी जवळ असलेल्या जुन्या खेड घाटात वन विभागाच्या हद्दीत उतरत्या झाडाझुडपांचे वाढलेल्या गवतातील शेतात सौरभ पाटील यांचा कुजलेल्या अवस्थेत मृत्यदेह आढळला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या-