Mumbai Crime : बंदुकीच्या धाकावर मुंबईतील व्यावसायिकाचं अपहरण केल्याचा आरोप, आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलांसह 15 ते 16 जणांवर गुन्हा
Mumbai News : बंदुकीच्या धाकावर मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.
Mumbai News : बंदुकीच्या धाकावर मुंबईतील (Mumbai) एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या मुलासह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. 10 ते 15 जणांनी बुधवारी (9 ऑगस्ट) दुपारी मुंबईतील गोरेगाव इथल्या ग्लोबल म्युझिक जंक्शन या कार्यालयात गोंधळ घालून, अपहरण करुन आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात नेलं. तिथे शिवीगाळ आणि मारहाण करत स्टॅम्प पेपर जबरदस्तीने स्वाक्षरी घेत करारनामा रद्द झाल्याचं लिहून घेतलं, असा आरोप फिर्यादी राजकुमार सिंह यांनी केला. मुंबईतील वनराई पोलिसांत या प्रकरणी मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे, विकी शेट्टी आणि इतर 10 ते 12 अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
करारनामा रद्द करण्यासाठी शिवीगाळ, मारहाण
राजकुमार सिंह यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "आपण मनोज मिश्रा याच्याबरोबर केलेल्या वर्षाच्या करारनामा केला होता. मात्र मनोज मिश्राने पैसे परत न करता हा करारनामा जबरदस्तीने रद्द करण्याकरता शिवीगाळ आणि मारहाण केली. नंतर आपल्याला कार्यालयातून खेचून कारमध्ये बसवून प्रकाश सुर्वे यांच्या मुंबईतील दहिसर पूर्व इथल्या युनिवर्सल हायस्कूल जवळील या कार्यालयात आणलं. यानंतर आपल्याकडून जबरदस्तीने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मनोज मिश्रा याच्यासोबत केलेला करारनामा रद्द झाला असं लिहून घेतलं."
साडेआठ कोटी रुपयांचं प्रकरण
यानंतर पोलिसांनी संबंधित व्यावसायिकाची अपहरणकर्त्यांपासून सुटका केली. पीडित राजकुमारचे वकील सदानंद शेट्टी यांनी माहिती दिली की, हे संपूर्ण प्रकरण साडेआठ कोटी रुपयांचं आहे. राजकुमार सिंह यांनी आदिशक्ती फिल्म्सचे मालक आणि आरोपी मनोज मिश्रा यांना संगीत निर्मितीसाठी साडेआठ कोटी रुपये दिले होते."
या प्रकरणी पीडित राजकुमार सिंहच्या वतीने वनराई पोलीस ठाण्यात स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यासह इतर जणांविरुद्ध अपहरण आणि शस्त्रास्त्र कायद्यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनराई पोलिसांनी या प्रकरणात भादंवि कलम 364-A, 452, 143, 147, 149, 323, 504 आणि 506 आणि 3, 25 शस्त्रास्त्र आधीनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा