(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : तलवारी दाखवून दहशत माजवली अन् डोंगरात लपला; पण अखेर पोलिसांच्या हाती लागलाच!
तलवारीने दहशत माजवणारा डोंगरात लपून बसलेला असतानाही पुणे पोलिसांनी त्याला हेरलं आणि अटक केली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात दहशत पसरवत होता.
Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीत वाढ होत आहे. रोज(Pune Koyta gang) अनेक परिसरात दहशत माजवण्याचे प्रकार समोर येत आहे. त्यातच पुन्हा एकदा तलवारीने दहशत निर्माण करून डोंगरात लपल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र या दहशत माजवणाऱ्या डोंगरात लपून बसला असतानाही पुणे पोलिसांनी हेरलं आणि त्याला अटक केली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात दहशत पसरवत होता.
ओंकार कुडले असं पुण्यातील कोथरूड परिसरात दहशत पसरविणाऱ्या तरुणाचं नाव आहे. बॅनरवर फोटो न लावल्यामुळे कोथरूड परिसरात तलवार फिरवत दहशत पसरवली होती. या प्रकरणी अक्षय गायकवाड यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून ओंकार कुडले याच्यासह साथीदाराविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर परिसरात एक ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ठिकाणी आरोपींनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. कुडले आणि त्याचा साथीदार त्यादिवशी पासून फरार होते. या घटनेमुळे संतप्त जमावाने आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दोघे आरोपी पवना धरणाच्या परिसरात डोंगराळ भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर हे पथकासह पवना धरण परिसरात रवाना झाले. तेथून कुडले आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.
कोयता गॅंगची दहशत कायम...
पुण्यात मोठ्या प्रमाणात कोयता गँग दहशत माजवताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील आता त्यांच्याविरोधात अॅक्शन प्लॅन आखला आहे. पोलीस या टोळीने जिथे दहशत माजवली त्यात परिसरात घेऊन जात त्यांची नागरिकांसमोरच रस्त्यावर वरात काढताना दिसत आहे. पुणे पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवायला देखील सुरुवात केली आहे. त्यामार्फत अनेक गुन्हेगारांचा शोध घेणं सुरु आहे. आतापर्यंत किमान सात ते आठ वेळा कोयगा गँगची भररस्त्यात धिंड काढली आहे. तसेच यापुढेही या टोळीची धिंड काढण्यात येणार आहे. या टोळीत अल्पवयीन मुलांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
पोलिसांकडून उपाययोजना
कोयता गँगने पुणे पोलिसांना पळता भुई सोडली आहे. रोज हल्ले, केक कापणं यात धिंड काढल्यानंतर आता पुणे पोलिसांनी आता DB ब्रांच आणि बिट मार्शलला पिस्तुल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या सगळ्या खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असं असलं तरीही कोयता गँगला रोखणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. या सगळ्यांना प्रशिक्षण दिल्यावर शहरातील गुन्हेगारी कमी होईल का?, कोयता गँगला आळा बसेल का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महाराष्ट्रातून एटीएसने घातपाती कारवायांचा कट उधळला, 15 ऑगस्टला देशात घातपाताचा होता कट