Pune Instagram Crime News : इंस्टाग्रामवरचं प्रेम भोवलं! प्रियकरानंच केले प्रेयसीचे नग्न फोटो व्हायरल
Pune Instagram crime News : इंस्टाग्रामवरील ओळख पुण्यातील तरुणीला महागात पडली आहे. पुण्यातील तरुणीचे अश्लील फोटो प्रियकराने सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pune Instagram crime News : इंस्टाग्रामवरील ओळख(crime) पुण्यातील तरुणीला महागात पडली आहे. पुण्यातील (Pune) तरुणीचे अश्लील फोटो प्रियकराने सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक ( crime News) प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 21 वर्षीय प्रियकरावर (Pune Nude Photo) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय बाळू सीतापे उर्फ ज्ञानेश्वर बाळू सीतापे असं या तरुणाचं नाव आहे. त्यांच्यावर स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पुण्यातील 21 वर्षीय तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही खाजगी कंपनीत नोकरी करतात. ऑक्टोबर 2021 मध्ये या दोघांची इंस्टाग्रामवर ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
आरोपीने त्या तरुणीचे काही अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले होते. काही दिवसांनी या दोघांचं भांडण झालं आणि त्यानंतर तरुणीने आरोपीला भेटण्यासाठी नकार दिला. आरोपी मात्र तिला भेटण्यासाठी जबरदस्ती करू लागला. यासाठी तो तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. तरीही तरुणी ऐकत नाही म्हटल्यावर आरोपीने हे न्यूड फोटो थेट तिच्या काकाच्या व्हॉट्सअपवर पाठवले. स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
काकाला पाठवला फोटो
दोघांमध्ये वाद झाल्यानंतर तरुणीने तरुणाला भेटण्यासाठी नकार दिला. याचा त्या तरुणाला राग आला. त्यानंतर त्याने रिलेशनशीपमध्ये असताना तरुणीचे काढलेले नग्न फोटो तरुणीच्या काकांना पाठवला. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यानुसार तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सोशल मीडियाच्या गुन्ह्यांत वाढ
काही दिवसांपूर्वीही नग्न फोटो व्हायरल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला होता. याप्रकरणी (Pune Crime) शिरूरमधील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवेंद्र धरमचंद फुलपगार असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचं नाव होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही प्रेमसंबंधात होते. काही दिवसांपूर्वी दोघाचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर देवेंद्रनं त्याच्या प्रियसीला त्रास द्यायला सुरुवात केली होती. प्रियकर तिचा मानसिक छळ करत होता. त्यामुळे तिने या त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेतली. पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे देवेंद्रनं प्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.