Pune crime : मित्रानेच केला घात! पॉर्नस्टार करण्याचे स्वप्न दाखवत मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ केला पॉर्न वेबसाईटवर व्हायरल
पॉर्नस्टार करण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वारजे परिसरात हा प्रकार घडला आहे.
Pune Crime : पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच मैत्रिणीचा (Pune crime) अश्लील व्हिडिओ पोर्न वेबसाईटवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वारजे परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणात ते दोघेही जण अल्पवयीन असल्याचे तपासातून पुढे आले आहे. वारजे पोलिस ठाण्यात याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोघांची सोशल मीडियावरुन ओळख झाली. दोघेही एकमेकांना भेटले देखील होते आणि त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. मित्राने तिला आंतरराष्ट्रीय पॉर्नस्टार बनवतो, असं आमिष दाखवलं त्यानंतर तिला अश्लील व्हिडीओ तयार करायला सांगितलं. मुलाच्या सांगण्यावरुन तिने स्वत:चा अश्लील व्हिडीओ तयार देखील केला. मित्रावर असलेला विश्वासावर तिने हे कृत्य केलं. मात्र त्याच मित्राने तिला धोका दिला. त्या मित्राने सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ मागून घेतले आणि एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड केले.
मैत्रिणीने साईटवर दाखवला व्हिडीओ
मुलीच्या जवळच्या मैत्रिणीने तिचा व्हिडीओ साईटवर अपलोड झाल्याचं सांगितलं. त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. हे सगळं कळल्यानंतर मुलीने आणि तिच्या मैत्रिणीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. मात्र भीतीमुळे त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. शेवटी पोलिसांनीच पुढाकार घेऊन तक्रार दिली. वारजे पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
सोशल मीडियाची मैत्री भोवते अन् गुन्हा घडतो
सोशल मीडियावरुन झालेली मैत्री अनेकांना महागात पडत असल्याचं चित्र आहे. नानाविध प्रकारचे आमिष दाखवून तरुणींना या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात. अनेक तरुणी अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडतात. सोशल मीडियामुळे होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना अनेक गोष्टींची काळजी घेण्याचं आवाहन सोशल मीडिया एक्सपर्ट वारंवार करतात.
सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी?
-सोशल मीडियासाठी Two Way Authentication चा वापर करा.
-पर्सनल मोबाइल नंबर आणि पब्लिक मोबाइल नंबर वेगळा ठेवा.
-कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका.
-टोपण नावाचा वापर करा. यूझर नेम म्हणून स्वतःचे खरे नाव वापरू नका.
-आपल्या ऑनलाइन प्रोफाइलमध्ये वैयक्तिक माहिती देऊ नका.
-प्रोफाइल सेट करताना सर्वात मजबूत प्रायव्हसी सेटिंग वापरा. यामुळे फक्त तुमचे मित्र तुमची माहिती पाहू शकतील.
-ऑनलाइन चॅटिंगचे नियम स्वतःच ठरवा. चॅट वापरण्याचा कालावधी स्वतःच ठरवून तो पाळण्याचा प्रयत्न करा.
-सार्वजनिक ठिकाणी असलेलं वायफाय/ इंटरनेट वापरू नका.