एक्स्प्लोर

Pune Bypoll Election Results : राज्यात भाजपला अपयश का येतंय? जाणून घ्या यामागचं कारण

Pune Bypoll Election Results: गेल्या काही महिन्यात झालेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला हवं तसं यश मिळालेलं नाही. याला अनेक कारणे आहेत, या कारणांची सध्या जोरदार चर्चा  सुरू आहे.

मुंबई : कसबा पेठ आणि  चिंचवड पोट निवडणुकीचा निकाल हाती (Pune Bypoll Election Results) आला आहे. यामध्ये कसबा पोटनिवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागला आहे, तर चिंचवड निकाल हा कसा बसा भाजपला (BJP) मिळवता आला आहे. गेल्या काही महिन्यात झालेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला हवं तसं यश मिळालेलं नाही. याला अनेक कारणे आहेत, या कारणांची सध्या जोरदार चर्चा  सुरू आहे. भाजपला अपयश का येतंय? यामागची काही महत्वाची करणे जाणून घेऊ...

अपयश पक्षातील अयोग्य नियोजनाअभावी आहे का?

कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अजिबात धक्कादायक वगैरे नाही. या निवडणुकीत काय होणार, याचा साधारण अंदाज आधीच आला होता. फक्त भाजपला यश मिळणार का नाही ते स्पष्ट बोलायला कोणी तयार नव्हतं, ते मात्र आज  स्पष्ट झाले आहे. अशाच प्रकारे गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला अपयश आले ते पक्षातील अयोग्य नियोजनाअभावी असे राजकीय वर्तुळत म्हटले जात आहे.

निर्णय बावनकुळे घेत नाहीत, यात होत होते हस्तक्षेप?

भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा संभाळल्यानंतर भाजपला अनेक चढ उतारांना सामोरे जावे लागले आहे. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका, शिक्षक पदवीधर विधानपरिषद, अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक, पुणे पोटनिवडणूक अशा निवडणुका पार पडल्या. त्यात मिळायला हवं तसं यश मिळालेलं पाहायला मिळत नाही. जरी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असले तरी  प्रत्येक निर्णय बावनकुळे यांना घेता येत नाही, यात कोणाचातरी हस्तक्षेप असतो. त्यामुळे फ्री होल्ड निर्णय घेता येत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

बावनकुळेंवर अपयशाचे खापर ?

गेल्या काही निवडणुका झाल्या त्या प्रदेशाध्यक्ष या नात्याने बावनकुळेंच्या नेतृत्वात झाल्या असून भाजपला स्वतःचा गढ असलेल्या नागपूरची जागा राखता आला नाही. 5 जागांपैकी भाजपला केवळ 1 जागेवर विजय मिळाला असून भाजपला जबर धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नागपूरची जागा गेल्याचे अपयश चंद्रशेखर बावनकुळे यांचे असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. तर प्रदेशाध्यक्ष असूनही राज्यातील अनेक नेत्यांवर बावनकुळे यांचा होल्ड नाही, अशी देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तसेच बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असूनही त्यांना दुसरच कोणीतरी होल्ड करते आहे, अशी टीका विरोधक करत आहेत.

या निवडणुकीत प्लांनिंग फसली का? 

आताच पार पडलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये भाजपने केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातले कॅबिनेट मंत्री, असे वरच्या फळीतले नेते प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. संपूर्ण  शक्ती पणाला लावली मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हातात असलेली एक जागा ही गमावली. कसब्याची प्रतिष्ठेची असलेली जागा काँग्रेसच्या ताब्यात गेली. कसब्यात आणि चिंचवडमध्ये प्लांनिंग फसली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील कसबा आणि चिंचवडमध्ये ठाण मांडून होते. तरीही भाजपला मोठा धक्का सहन करावा लागल्यामुळे या पराभवाचे खापर आता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि इतर नेत्यांवर ही फोडले जात आहे.

कार्यकर्त्यांमध्ये विश्लेषण करत टीकाटिप्पणी 

या निवडणुकांच्या निकालानंतर भाजपतले कार्यकर्ते आपल्या आपल्या परीने विश्लेषण करत नेते मंडळींवर खापर फोडताना दिसतात. यामुळे भाजपातली अंतर्गत गट बाजी देखील पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियामध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. तसेच यापूर्वी नागपूरची पदवीधर विधान परिषदेची जागा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे गेली. तर पुण्याची जागा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे गेली अशी चर्चा सोशल मीडियावर  आहे. 

भाजपने लोकांना गृहीत धरल्यामुळे होतंय का?

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लागलेल्या निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपने मतदारांना गृहीत धरले होते, त्यामुळे अपयशाला सामोरे जावं लागलं असं म्हटलं जातंय. देशात भाजपची लाट आहे, त्यामुळे राज्यात देखील याचा फायदा होईल, असं राज्यातील भाजप नेत्यांना वाटत होतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील घडामोडी राजकारण पाहता भाजप विरोधात प्रचार झालेला आहे. त्यामुळे भाजपला लोक नाकारत आहेत, असं विरोधक म्हणत आहेत. यामध्ये वाढती महागाई, शेतकरी आणि सर्वसामान्यांचे असलेले प्रश्न, उद्योग आणि रोजगार दुसऱ्या राज्यात चालला आहे. त्यामुळे भाजपवर लोक नाराज असल्याचं विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं आहे.

भाजप विरोधात महाविकास आघाडी खंबीर

भाजपला राज्यात प्रत्येक ठिकाणी पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी पक्षातील तिन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचच एक चांगलं उदाहरण शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणूक तसेच चिंचवड व  कसबा पोटनिवडणुकीत पाहायला मिळालं. भाजपचा पराभव करण्यासाठी आणि भाजपची राज्यातील सत्ता घालवण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांशी समन्वय करून लढत आहेत. मात्र चिंचवडमध्ये जर राहुल कलाटे उमेदवार नसते तर तीही जागा भाजप गमावून बसली असती.

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Embed widget