एक्स्प्लोर
पेपर तपासणीसाठी पुणे, कोल्हापूर विद्यापीठ मुंबई विद्यापीठाच्या मदतीला
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठासह पुणे विद्यापीठानं मुंबई विद्यापीठाचे पेपर तपासण्याची तयारी दाखवली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल जाहीर होण्याबाबत अनिश्चितता अजूनही कायम असताना, विद्यापीठ प्रशासनासाठी दिलासादायक बातमी आहे. कारण आता कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठासह पुणे विद्यापीठानं मुंबई विद्यापीठाचे पेपर तपासण्याची तयारी दाखवली आहे.
कोल्हापूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन केंद्रांवर 35 हजार पेपर तपासण्याची शिवाजी विद्यापीठानं दाखवली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानभवनात याबाबतची माहिती दिली. पेपर तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ मदत करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
याआधीही नागपूर विद्यापीठानं पेपर तपासण्यासाठी मुंबई विद्यापीठाला मदतीची तयारी दाखवली होती. पण आता शिवाजी विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठाने पेपर तपासणीची तयारी दर्शवल्याने मुंबई विद्यापीठासाठी दिलासादायक घटना आहे.
दरम्यान, विद्यापीठाचे निकाल रखडल्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचं नुकसान सुरूच आहे. कारण, आणखी 4 दिवस महाविद्यालंय बंद ठेवण्यात येणार आहेत. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापक व्यस्त राहणार असल्यामुळं 31 जुलैपर्यंत कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठानं घेतलाय. त्यामुळं पुढचे 4 दिवस कॉमर्स, आर्टस, आणि लॉच्या विद्यार्थ्यांना घरीच बसावं लागणार आहे.
दुसरीकडे मुंबई विद्यापीठात काल दिवसअखेर 4 हजार 582 शिक्षकांनी 1 लाख 4 हजार 128 उत्तरपत्रिका तपासणीचं काम पूर्ण झालंय. 31 जुलैपर्यंत विद्यापीठाला आणखी 4 लाख उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत.
संबंधित बातम्या
पेपर चेकिंगसाठी मुंबईतील कॉलेजेस आणखी चार दिवस बंद
मुंबईच्या 2 लाख उत्तरपत्रिका नागपुरात, तासाला 13 पेपर तपासावे लागणार!
31 जुलैपूर्वीच मुंबई विद्यापीठाचे निकाल, तावडेंचं आश्वासन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement