Pune news : पुणेकरांसाठी हादरवणारं वर्ष; वर्षभरात 305 अपघात अन् शेकडो मृत्यू, नवले पुल तर मृत्यूचा सापळाच!
Pune Accident News : कोरोना काळामध्ये घडलेली शहरातील अपघातांची संख्या यंदाच्या वर्षात पुन्हा कोरोना जैसे थे झाली आहे. यावर्षी पुण्यात तब्बल 305 अपघात झाले आहेत आणि या अपघातात 311 जणांचा मृत्यू झाला.
Pune Accident News : कोरोना काळामध्ये घडलेली (pune) शहरातील अपघातांची (Pune accident) संख्या यंदाच्या वर्षात पुन्हा कोरोना जैसे थे झाली आहे. यावर्षी पुण्यात तब्बल 305 अपघात झाले आहेत आणि या अपघातात 311 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी शहरातील अपघाताचं प्रमाण जास्त आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.
दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी अपघातांची संख्या वाढली आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आकडेवारीनुसार अपघातात दुचाकी चालकांच्या मृत्यूची संख्या जास्त आहे. पुण्यात महाराष्ट्रातील अनेक तरुण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी येतात आणि पुण्यातच स्थायिक होतात. त्यामुळे पुण्यात तुलनेपेक्षा तरुणाची संख्या जास्त आहे. अनेक अतिउत्साही तरुणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मृतांमध्ये दुचाकी स्वरांचे प्रमाण जास्ती आहे.
दोन वर्षात 374 अपघात
दोन वर्ष कोरोनाने डोकं वर काढलं होतं. अनेक ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र कोरोना कमी झाल्यामुळे गर्दी वाढू लागले. महाविद्यालयं देखील पूर्णसंख्येने सुरु करण्यात आले. त्यामुळे तरुणदेखील प्रवास करत आहे. यावर्षी पेक्षा मागच्या दोन वर्षातील अपघाताची संख्या कमी आहे.
सर्वाधिक अपघात महामार्गावर
गेल्या काही वर्षात शहर मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. त्यामुळे पूर्वी शहराबाहेर असलेले महामार्ग आता शहराचा एक भाग झाले आहेत. त्यामुळे या शहरात होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात महामार्गांवरच होत आहेत. महामार्गांवर दुचाकी आणि छोट्या कारची वाहतूक वाढली असून अपघातांमध्ये हीच वाहने बळी पडत आहेत.
19 ब्लॅकस्पॉट निश्चित
शहरातील 19 अपघात प्रवण ठिकाणी (ब्लॅकस्पॉट) निश्चित केली आहेत. या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी वाहतूक विषयक सुधारणा करण्यासंबंधी वाहतूक पोलिसांनी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला असून त्यानुसार काही सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत.केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून रस्ते अपघातात मृत पावणाऱ्यांमध्ये 67% दुचाकी स्वारांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवले पुलावर अपघाताचं सत्र
यावर्षी नवले पुलावर अपघाताचं सत्रच बघायला मिळालं. दोन दिवसात चार अपघात झाले होते. नवले पुलाने आतापर्यंत 66 जणांचा जीव घेतला.2014 पासून आतापर्यंत दरी पूल ते नवले पूल आणि धायरी पूल या साडे तीन किलोमीटरच्या अंतरात तब्बल 185 अपघात झाले आहेत. या अपघातांमधे 66 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी झाले आहेत.