एक्स्प्लोर
रस्त्यासाठी वृक्षतोड, पुणेकरांचं रात्रभर झाडाखाली ठाण!

पुणे: रस्ता रुंदीकरणासाठी पुणे विद्यापीठालगतच्या रस्त्यावरील मोठे वृक्ष तोडण्यात येत आहेत. याचा निषेध करण्यासाठी विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या झाडांच्या जवळच ठिय्या मांडून आंदोलन केलं. रात्रभर या झाडांशेजारी झोपूनच त्यांचं संरक्षण करण्यात आलं. महापालिकेकडून औंध आणि शिवाजीनगरला जोडणाऱ्या रस्त्यालगचे मोठे वृक्ष तोडण्यास काल सुरुवात झाली. नागरिकांनी आक्षेप घेतल्यावरही झाडांची तोडणी सुरुच होती. अखेर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर ती थांबली. महापालिकेचा ठेकेदार रात्रीत येऊन झाडं तोडू नये यासाठी आसपासच्या सोसायटीत राहणारे लोक अंथरुण घेऊन या झाडांजवळ ठाण मांडून राहिले. महापालिकेच्या उद्यान विभागाने तब्बल 23 मोठी झाडं तोडण्यास आणि सहा झाडांचं पुर्नरोपण करण्यास परवानगी दिल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
निवडणूक























