एक्स्प्लोर
राज्यातील निवासी तसेच इंटर्न डॉक्टरांचे आज आंदोलन, कोलकात्यात डॉक्टरांना मारहाणीच्या घटनेचा निषेध
या दोन्ही संघटना आज राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात हाताला काळ्या पट्ट्या बांधून आणि डोक्यात हेल्मेट घालून निषेध दर्शवत आंदोलन करणार आहे

मुंबई : कोलकत्यातील ज्युनियर डॉक्टरला पेशंटच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज राज्यातील निवासी तसेच इंटर्न डॉक्टर आंदोलन करणार आहेत. राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात मार्डचे निवासी डॉक्टर तसेच asmi चे इंटर्न डॉक्टर्स निदर्शने करणार आहेत. यावेळी हातात काळी रिबीन बांधून तसेच हेल्मेट परिधान करून वेगवेगळ्या रुग्णालयात निषेध केला जाणार आहे. तसेच आपत्कालीन सेवा सोडून काम न करण्याचे आवाहन देखील केले आहे. राज्यात मार्डचे 4500 हजार डॉक्टर तर ASMI चे 2500 हजार डॉक्टर आंदोलन करणार असल्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होणार आहे. कोलकाता शहरातील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी एका वृद्धाचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी एका निवासी आणि एका इंटर्न डॉक्टरला मारहाण केली. डॉ. परिबहा मुखोपाध्याय आणि डॉ. यश टेकवानी या दोन डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली. कोलकात्यातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. कोलकात्यातील डॉक्टरांवर झालेल्या या हल्ल्याचा महाराष्ट्रातील डॉक्टरांनी देखील निषेध केला आहे. महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना (MARD) आणि इंटर्न डॉक्टरांची संघटना (ASMI) यांनी डॉक्टरांनी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत डॉक्टरांना न्याय देण्यासाठी आम्ही उभे राहणार आहोत, अशी भूमिका घेतली आहे. या दोन्ही संघटना उद्या राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात हाताला काळ्या पट्ट्या बांधून आणि डोक्यात हेल्मेट घालून निषेध दर्शवत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात MARD चे 4500 हजार तर ASMI चे 2500 हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















