एक्स्प्लोर

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या पंढरपुरात आंदोलन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आंदोलनामुळे प्रशासन अलर्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र भजन-किर्तनासाठी मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी वारकरी संघटनांमार्फत करण्यात आली होती.

सोलापूर : पंढरपुरात वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनाची संभाव्य गर्दी पाहता पोलिसांमार्फत खबरदारी घेतली जात आहे. पंढरपूरच्या सर्व सीमा आणि विठ्ठल मंदीर परिसरात मोठा फौजफाटा पोलिसांमार्फत तैनात करण्यात आला आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर लोखंडी बॅरेकेडिंग लावण्यात आले आहेत. उद्या रात्रीपर्य़ंत जवळपास 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा पंढरपुरात तैनात असणार आहे. विशेष म्हणजे आदोलकांची मोठी संख्या जिल्ह्याभरान येणार असल्याचा अंदाज असल्याने पंढरपूरकडे येणारी एसटी वाहतूक सेवा बंद करण्याचा प्रस्ताव पोलिसांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता, तो त्यांनी स्वीकारला आहे.

जिल्ह्यातील कोणत्याही आगारातून पंढरपुराकडे येणारी एसटी वाहतूक बंद करण्याचा हा प्रस्ताव होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक आणि पंढरपुरातील स्थानिक यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून हा प्रस्ताव पाठवल्याची माहिती ग्रामीण पोलिस विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. तर पोलिसांच्या या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर दिली असून, एसटी प्रशासनास तसे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र भजन-किर्तनासाठी मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी वारकरी संघटनांमार्फत करण्यात आली होती. याच मागणीला पुढे नेत विठ्ठल मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरी यांनी केली. त्यासाठी 31 ऑगस्ट रोजी पंढरपुरात 1 लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा दिला. शासनातर्फे अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाहीये. त्यामुळे उद्या पंढरपुरात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन होणार आहे.

कोरोनाचं नाटक बंद करा, खऱ्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावं : प्रकाश आंबेडकर

यासाठी प्रकाश आंबेडकर हे आज संध्याकाळी सोलापूर जिल्ह्यात दाखल होतील. आज संध्याकाळी वारकरी संघटनांसोबत बैठक होणार असून उद्या सकाळी ते पंढरपुरात दाखल होतील. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली. आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान होईल, त्यांनंतर पुंडलिक दर्शन करुन प्रकाश आंबेडकर हे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील. या आंदोलनला 200 पेक्षा जास्त संघटनाचा पाठिंबा असल्याची माहिती देखील वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली.

विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात 1 लाख वारकरी आंदोलन करणार

याआधी 12 ऑगस्टला आंबेडकरांनी राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करण्यासाठी 'डफली बजाओ' आंदोलन केलं होतं. या आंदोलनात नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानक चौकात आंबेडकरांनी स्वत: डफली वाजवत आंदोलनात सहभाग नोंदवला. तर लॉकडाऊनमुळे अनेकांची उपासमार होत आहे असे म्हणत नाभिक समाज आणि इतर श्रमिकांच्या मागण्यांसाठी देखील वंचिततर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. तर लॉकडाऊनच्या कालावधीत भरमसाठ वीजबिले पाठवण्यात आली आहेत, ही बिले सरसकट माफ कऱण्यात यावी यासाठी देखील वंचिततर्फे आंदोलन करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
ED Raid on I-PAC: पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Gold Silver Rate : दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
US Russia Sanctions Bill: तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
Embed widget