Priyanka Chaturvedi: तीन राज्यातल्या पराभवाचं काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, प्रियंका चतुर्वेदींचा काँग्रेसला सल्ला
जनतेला कोर्ट, निवडणूक आयोगकडून अपेक्षा आहेत. गद्दारी झाली आहे, या निवडणुकीत रणनीती ही केंद्र सरकारने बनवली आणि ते यशस्वी झाले, असेही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या
![Priyanka Chaturvedi: तीन राज्यातल्या पराभवाचं काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, प्रियंका चतुर्वेदींचा काँग्रेसला सल्ला Priyanka Chaturvedi advises Congress to introspect its defeat in three states Election Result 2023 Priyanka Chaturvedi: तीन राज्यातल्या पराभवाचं काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, प्रियंका चतुर्वेदींचा काँग्रेसला सल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/03/3c6cffe8a2f90f938c601641f81f532c170159619292489_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : उत्तर भारतात भाजपचाच (BJP) वरचष्मा असल्याचे उघड झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपला यश मिळाले आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशात भाजपला सत्ता राखण्यात यश मिळाले आहे. भाजपच्या या विजयानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहे. तीन राज्यातल्या पराभवाचं काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी (Priyanka Chaturvedi) काँग्रेसला दिला आहे
तीन राज्यातले निकाल हे धक्का देणारे आहे. काँग्रेसकडून काही कमतरता झाले आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसची बाजी अचानक कशी पलटली याचा अभ्यास केला पाहिजे. तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय मिळाला ही अतिशय आनंदाची बाब आहे. 2018 साली काँग्रेसचा तीन राज्यांमध्ये विजय झाला होता. परंतु 2024 मध्ये आता त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. कदाचित आगाी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय होण्याची शक्यता आहे.
मतदार गद्दारांना क्षमा करणार नाही : प्रियंका चतुर्वेदी
प्रियंका चतर्वेदी महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फोडण्यात आले आहे. कार्यक्षम मुख्यमंत्र्यांना गद्दारी करून घरी बसवण्यात आली आहे. हे महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. मतदार गद्दारांना क्षमा करणार नाही. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा विकास विजय निश्चित आहे.
चार राज्यांच्या निवडणुकीती रणनीती केंद्र सरकारने बनवली : प्रियंका चतुर्वेदी
राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये भाजपने कोणाचा चेहरा दिलेला नव्हता. निवडणुकांची सर्व तयारी दिल्लीतून केल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील सगळा कारभार हा गुजरातला चालला आहे. जनतेला कोर्ट, निवडणूक आयोगकडून अपेक्षा आहेत. गद्दारी झाली आहे, या निवडणुकीत रणनीती ही केंद्र सरकारने बनवली आणि ते यशस्वी झाले, असेही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये (Assembly Election Result) काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अपेक्षा असतानाही त्यांना जनतेने नाकारलं आहे. त्यामुळे 1980 नंतर पहिल्यांदाच उत्तर भारतातील हिंदी बेल्टमध्ये काँग्रेसची (Congress In Hindi Belt) सत्ता नसेल. त्यामुळे हिंदी बेल्टमधून काँग्रेस 'आऊट' झाल्याचं स्पष्ट झालंय. मध्य प्रदेश (Madhya Pradesh Election Result) आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या पराभवाची सर्वाधिक चर्चा होत आहे. पक्षाच्या अंतर्गत अहवालात या राज्यांमध्ये विजयाचा दावा करण्यात आला होता. खुद्द राहुल गांधींनी मध्य प्रदेशात 135 जागा मिळण्याचा दावा केला होता. त्याचवेळी अनेक सर्वेक्षणांमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसची मजबूत स्थिती दिसून येत होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)