एक्स्प्लोर
पुण्यातील तुरुंगातून फरार कैद्याची अहमदनगरमध्ये हत्या
गावातील जुन्या वादातून लाकडी दंडक्याने डोके, गळा आणि गुप्तांगावर मारहाण करुन राहुलचा जीव घेण्यात आला. कर्जत पोलिस ठाण्यात आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : पुण्यातील तुरुंगातून फरार झालेल्या कैद्याची अहमदनगरमध्ये हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. लाकडी दांडक्याने डोकं, गळा आणि गुप्तांगावर मारहाण करुन राहुल गोयकरची हत्या करण्यात आली. कुख्यात आरोपी राहुल गोयकर हा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खंडाळा गावात राहात होता. एका गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतर त्याची रवानगी पुण्यातील खेडमधल्या तुरुंगात झाली होती. एका महिन्यापूर्वी तुरुंग फोडून राहुल फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते, मात्र तो लपून बसल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यानंतर राहुल राहत असलेल्या खंडाळा गावातच त्याची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली. गावातील जुन्या वादातून लाकडी दंडक्याने डोके, गळा आणि गुप्तांगावर मारहाण करुन राहुलचा जीव घेण्यात आला. त्यानंतर कर्जत पोलिस ठाण्यात आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा























