एक्स्प्लोर

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नव्या नियमांनुसार बदल्यांचे सरकारचे अधिकार शाबूतच राहणार आहेत. शैक्षणिक वर्षाच्या मध्येच बदल्या होऊ नयेत यासाठी दोन शिक्षक संघटनांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती.

नवी दिल्ली : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. महाराष्ट्रातले जवळपास 1 लाख 83 हजार प्राथमिक शिक्षक या निर्णयानं प्रभावित होणार आहेत. नव्या नियमांनुसार बदल्यांचे सरकारचे अधिकार शाबूतच राहणार आहेत. शैक्षणिक वर्षाच्या मध्येच बदल्या होऊ नयेत यासाठी दोन शिक्षक संघटनांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती (सांगली शाखा) आणि सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघानं ही याचिका दाखल केली होती. मात्र बदली हा नोकरीचा अविभाज्य घटक आहे, जिथे बदली करण्यात आलीय तिथे काम करणं हे गरजेचं आहे हे राज्य सरकारचं म्हणणं सुप्रीम कोर्टानं मान्य करत या दोनही याचिका फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती ए के गोयल, न्यायमूर्ती जे जे भानुमती यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सरकारच्या वतीनं अॅड. निशांत कातनेश्वरकर यांनी तर शिक्षक संघटनांच्या बाजूनं एस बी तळेकर यांनी बाजू मांडली. सरकारनं संगणकीकृत पद्धतीने बदल्या करण्यासंदर्भात 27 फेब्रुवारी 2017 रोजी एक शासननिर्णय जारी केला होता. या नव्या निर्णयानं वर्षानुवर्षे एका ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांना अचानक बदली हे संकट वाटू लागलं होतं. याआधी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या सेवाज्येष्ठतेनुसार होत होत्या, शिवाय त्या बदल्यांचं प्रमाण देखील किरकोळ होतं. पण या नव्या पद्धतीत सेवाज्येष्ठतेचा हा नियम डावलण्यात आला होता. वर्षानुवर्षे तालुक्यातच बदली करुन घेणाऱ्या शिक्षकांची सद्दी मोडून काढत सुगम-दुर्गम अशी विभागणी करुन दुर्गम भागातल्या शिक्षकांची संख्या वाढवणं हा सरकारच्या नव्या जीआरमागचा उद्देश होता असं सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनी म्हटलं. नव्या जीआआरविरोधातल्या सर्व याचिका 22 जूनलाच फेटाळण्यात आल्या होत्या. त्यानंतरही सरकार शांत का बसलं आणि नंतर 23 ऑक्टोबरला नवा जीआर काढून शैक्षणिक सत्राच्या मध्येच बदल्यांचा घाट का घातला, असा सवाल शिक्षक संघटनांचे वकील एस बी तळेकर यांनी विचारला. कोर्टानं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्यानंतर बदल्यांबद्दल सरकारचे अधिकार शाबूत ठेवलेत. शिवाय उशीराने आणलेल्या जीआरबद्दल काही शंका असतील तर शिक्षक संघटनांनी पुन्हा हायकोर्टात दाद मागावी असं स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget