एक्स्प्लोर

गडचिंचले प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करा; प्रविण दरेकर यांची मागणी

गडचिंचले प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी प्रविण दरेकर यांनी केली. यावेळी पोलिसांवर कारवाई केली. मात्र, दोषी असलेल्या जिल्हा प्रशासनावर कारवाई का नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

पालघर : जिल्ह्यातील गडचिंचले प्रकरणाला 25 दिवस उलटले असले तरीही पोलिसांना यातील प्रमुख सूत्रधाराचा शोध घेण्यास अपयश आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात यावी,” अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे यांनी गडचिंचले भागाचा दौरा केला. त्यानंतर ते बोलत होते.

गडचिंचले प्रकरणानंतर आपण लगेचच घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाने आपल्याला रोखले असल्याचे दरेकर यांनी सांगितले. राज्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा अपेक्षित गतीने तपास होत नसल्याचा आरोप त्यांनी या दौऱ्यानंतर पालघर येथील पत्रकार परिषदेत केला.

“या हत्याकांडात जमावाने केलेला हल्ला चिथावणीतून झाला होता, विशिष्ट माथेफिरूनी हा कट रचला होता का? या साधू मंडळांची पोलिसांसमोर अमानुषपणे हत्या झाली असता त्यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार का केला नाही? पोलिसांना प्रथम मारहाण झाली असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे, मग अशा मारहाणीची बाब जिल्हा मुख्यालयाला कळवण्यात दिरंगाई का केली?,” असे सवाल त्यांनी यावेळी केले. “एक तासाच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी पोलिसांना पोहोचण्यास पाच तास लागले असे अनेक प्रश्न निरुत्तरित आहेत. या प्रकरणाची जलदगतीने चौकशी होणे आवश्यक असल्याचे,” प्रवीण दरेकर यांनी नमूद केलं.

पालघर हत्याकांड प्रकरणी पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर

उशिरा दौरा करून काय साध्य झालं? गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या भागाचा उशिराने दौरा करून काय साध्य केले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पालघर पोलीस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याबाबत विचारले असता, “पोलिसांसोबत या घटनेला जिल्हा प्रशासनदेखील तितकेच जबाबदार असून सर्व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांकडून दोषी असलेल्या पोलीस सहकाऱ्यांची निःपक्ष पद्धतीने चौकशी होईल का? याबाबत शंका उपस्थित करून हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. या बाबतचे पत्र त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले. तसेच त्यांनी पालघरच्या प्रभारी पोलीस अधीक्षकांसोबत या घटनेसंदर्भात व सुरु असलेल्या चौकशी संदर्भात चर्चा केली.

पालघर हत्याकांड आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही, राजकारण करु नका : शरद पवार

पक्षाची भूमिका सर्वसमावेशक विधानपरिषदेच्या तिकीटवाटप दरम्यान ज्येष्ठ नेत्यांना डावललं या बाबत प्रवीण दरेकर यांना विचारणा केली असता पक्षात ज्येष्ठ मंडळींचा सन्मान कायम असल्याचे सांगितले. पक्षाची भूमिका सर्वसमावेशक असल्याचेही त्यांनी नमूद केले. नव्या- जुन्यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला जात असून पक्षांच्या ध्येयधोरण अनुसार तिकीट वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Palghar Mob Lynching | पालघर हत्याकांड प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Tukaram Munde On Bollywood Actors Pan Masala Advertisement: शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget