एक्स्प्लोर

लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!

श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, प्रतिभा पाचपुते या स्वतः ऐवजी मुलगा विक्रमसिंह यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत.

Shrigonda Assembly News : भाजपने आज विधानसभेच्या उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण 99 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, प्रतिभा पाचपुते या स्वतः ऐवजी मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. भाजपची उमेदवारी जाहीर झालेल्या प्रतिभा पाचपुते यामुंबईकडे रवाना झाल्या आहेत. 

प्रतिभा पाचपुते मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही 

प्रतिभा पाचपुते स्वतः ऐवजी मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. पक्षश्रेष्ठीकडे मनधरणी करण्यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. श्रीगोंदा विधानसभेत निवडणूक कोण लढवणार? यासाठी आज काष्टीत कार्यकर्ता मेळावा ठेवला होता. दरम्यान, आज पहिल्याच यादीत प्रतिभा पाचपुते यांना भाजपने जाहीर केली होती. मात्र आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रतिभा पाचपुते या आग्रही आहेत. त्यामुळं आता त्यांच्या या मागणीवर पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनादेखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.

भाजपची पहिली उमेदवार यादी 

नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस
 कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा - राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा - जयकुमार रावल
शिरपूर - काशीराम पावरा
रावेर - अमोल जावले
भुसावळ - संजय सावकारे 
जळगाव शहर - सुरेश भोळे 
चाळीसगाव - मंगेश चव्हाण 

जामनेर -गिरीश महाजन 
चिखली -श्वेता महाले 
खामगाव - आकाश फुंडकर 
जळगाव (जामोद) - संजय कुटे 
अकोला पूर्व - रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे - प्रताप अडसद 
अचलपूर - प्रवीण तायडे 
देवली - राजेश बकाने 
हिंगणघाट - समीर कुणावार 
वर्धा - पंकज भोयर 
हिंगना - समीर मेघे 
नागपूर दक्षिण - मोहन माते 

नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे
तिरोरा - विजय रहांगडाले 
गोंदिया - विनोद अग्रवाल 
अमगांव - संजय पुरम
आर्मोली - कृष्णा गजबे 
बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार 
चिमूर - बंटी भांगडिया 
वाणी - संजीवरेड्डी बोडकुरवार 
रालेगाव - अशोक उडके 
यवतमाळ - मदन येरवर 
किनवट - भीमराव केरम 
भोकर - क्षीजया चव्हाण 
नायगाव - राजेश पवार 
मुखेड - तुषार राठोड 

हिंगोली - तानाजी मुटकुले 
जिंतूर - मेघना बोर्डीकर 
परतूर - बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे 
भोकरदन -संतोष दानवे 
फुलंब्री - अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे 
गंगापूर - प्रशांत बंब 
बगलान - दिलीप बोरसे 
चंदवड - राहुल अहेर
नाशिक पुर्व - राहुल ढिकाले 
नाशिक पश्चिम - सीमाताई हिरे 
नालासोपारा - राजन नाईक 
भिवंडी पश्चिम - महेश चौघुले 
मुरबाड - किसन कथोरे 
कल्याम पूर्व - सुलभा गायकवाड 
डोंबिवली - रवींद्र चव्हाण 
ठाणे - संजय केळकर 
ऐरोली - गणेश नाईक
बेलापूर - मंदा म्हात्रे 
दहिसर - मनीषा चौधरी 
मुलुंड - मिहिर कोटेचा 
कांदिवली पूर्व - अतुल भातखलकर 
चारकोप - योगेश सागर 
मालाड पश्चिम - विनोद शेलार
गोरेगाव - विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम - अमित साटम 
विले पार्ले - पराग अलवणी 
घाटकोपर पश्चिम - राम कदम 
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार 
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन 
वडाळा - कालिदास कोळंबकर 
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा 
कुलाबा - राहुल नार्वेकर 
पनवेल - प्रशांत ठाकूर 
उरन - महेश बाल्दी 
दौंड- राहुल कुल 
चिंचवड - शंकर जगताप 
भोसली -महेश लांडगे 
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोले 
कोथरुड - चंद्रकांत पाटील 
पर्वती - माधुरी मिसाळ 
शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील 
शेवगाव - मोनिका राजले 
राहुरी शिवाजीराव कर्डिले 
श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते 
कर्जत जामखेड - राम शिंदे 
केज - नमिता मुंदडा 
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर 
औसा - अभिमन्यू पवार 
तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील 
सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी 
सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख 
मान -जयकुमार गोरे 
कराड दक्षिण - अतुल भोसले 
सातारा - शिवेंद्रराजे भोसले 
कणकवली - नितेश राणे 
कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक 
इचलकरंजी - राहुल आवाडे 
मिरज - सुरेश खाडे 
सांगली - सुधीर गाडगीळ 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
Amravati: धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, अमरावतीतून तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
Devendra Fadnavis: मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्राचा कारभार चालवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना कोणता कानमंत्र दिला?
Suresh Dhas On Massajog Crime: या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :  12 डिसेंबर 2024:  ABP MajhaRohit Pawar on Ajit Pawar : राजकारणापलिकडचे संबंध, हीच तर आपली चांगली संस्कृतीYugendra Pawar on Sharad Pawar : ही भेट कौटुंबिक, कुटुंब एकत्र आलं पाहिजेAjit Pawar on Cabinet Expansion : बहुतेक 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार - अजित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
Amravati: धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, अमरावतीतून तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
Devendra Fadnavis: मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्राचा कारभार चालवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना कोणता कानमंत्र दिला?
Suresh Dhas On Massajog Crime: या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात तेजी, गुंतवणुकीची चांगली संधी...
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, गुंतवणुकीची चांगली संधी...
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Embed widget