Prakash Ambedkar : मानापमानाच्या नाट्यानंतर अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश, अधिकृत पत्र जारी
Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आल्याचं एक अधिकृत पत्र जारी करण्यात आलं आहे.
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) औपचारिकरित्या महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला. याबाबतचं महाविकास आघाडीने अधिकृत पत्र जारी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याच्या चर्चा रंगल्या होत्या. गुरूवारच्या बैठकीत मानापमान नाट्यही रंगलं होतं. वंचितच्या प्रतिनिधींना बाहेर तासभर उभं केल्याने मविआने अपमान केल्याचा आरोपही वंचिततर्फे करण्यात आला होता. मात्र अखेर आज वंचितचा मविआत समावेश करत असल्याचं पत्र जारी करण्यात आलं.
गुरुवारी झालेल्या मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हावं यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झालं असून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.
वंचीत बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाला.
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 30, 2024
ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे 2 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील.
वंचीत मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल.भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल.@Prksh_Ambedkar… pic.twitter.com/BpkyWDvlt9
महाविकास आघाडीची पुढची बैठक ही 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी वंचितच्या वतीने प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर हे स्वतः त्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अद्याप पत्र पाहिलं नाही
वंचितची महाविकास आघाडीमध्ये सामील करण्यासंदर्भात अधिकृत पत्र जारी करण्यात आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपल्याला अद्याप अधिकृत पत्र प्राप्त झालं नाही, ते मिळाल्यावर भूमिका मांडू असं म्हटलं.
मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत वंचित महाविकास आघाडीमध्ये सामील होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी बैठकीचं आमंत्रण आल्याचं जाहीर केलं होतं. त्यांच्यावतीनं आज बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर पोहोचले. त्यांच्याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, विनायक राऊत, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अनिल देशमुख आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोलेंसह वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. लोकसभेच्या दृष्टीनं आज झालेली बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.
ही बातमी वाचा: