22 जानेवारीला आम्ही दिवाळी साजरी करतो फक्त मोदींनी हजार रुपये द्यावे, प्रकाश आंबेडकरांचा टोला
22 जानेवारीला आम्ही दिवाळी साजरी करु परंतु मोदींनी सर्व गरीब लोकांना एक हजार रुपये द्यावे , असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.
पुणे : अयोध्येत (Ayodhya) श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या दिवशी देशात दिवाळी साजरे करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. वंचिक बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोदींच्या या आवाहनावर टीका केली आहे. तसेच 22 जानेवारीला आम्ही दिवाळी साजरी करु परंतु मोदींनी सर्व गरीब लोकांना एक हजार रुपये द्यावे , असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या जागा वाटपावर जनतेला स्पष्ट सांगावे, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकरांची उलटतपासणी आज पूर्ण झाली आहे. त्यानंतर ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
अयोध्येत (Ayodhya) श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला जाणार का या प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकर म्हणाले, मला अद्याप निमंत्रण आलेले नाही. वर्तमानपत्रातून कळले आहे आमंत्रण पाठवले जाणार आहे. अजून माझ्यापर्यंत आलं नाही. 22 जानेवारीला आम्ही दिवाळी साजरी करू. मोदींनी सर्व गरीब लोकांना एक हजार रुपये द्यावे म्हणजे आम्ही दिवाळी साजरी करत येणार आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांना हजार रुपये द्यावं म्हणजे दिवाळी साजरी करू. मोदींनी सर्व गरीब लोकांना एक हजार रुपये द्यावे म्हणजे आम्हाला दिवाळी साजरी करता येणार आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांना 1000 रुपये द्यावं म्हणजे दिवाळी साजरी करू.
आघाडीत जागावाटपाचा काय ठरलं? जनतेला सांगा : प्रकाश आंबेडकर
अकोला ही जागा परंपरेनुसार प्रकाश आंबेडकरांनी लढावी, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.अकोला मतदारसंघ महत्वाचं नाही. मी लढलो किंवा नाही लढलो फरक पडणार नाही . ज्यांना निवडणूक लढायचे त्यांनी लढावं मी मदत करणार आहे. माझं शिवसेनेकडे एकच अपेक्षा आहे . आघाडीत जागावाटपाचा काय ठरलं? ते जनतेला सांगावे. शिवसेना ठाकरे गटाने जागा वाटप बद्दल काय चर्चा झाली ते त्यांनी सांगावं. राष्ट्रवादी आणि काँग्रेस किती जागा लढवणार? या संदर्भात स्पष्टपणे सांगावे. आजपर्यंत जागा वाटप का केले नाही याचं प्रामाणिक उत्तर त्यांनी जनतेला सांगा असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच इंडिया आघाडीच्या उद्याच्या बैठकीच आमंत्रण नसल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीसांची साक्ष महत्त्वाची
आधीच होती. परंतु संबंधित पोलीस स्टेशनला ती माहिती दिली गेली नाही. त्यामुळे हा हल्ला वाचवता आला नाही. कोरेगाव भीमा प्रकरणात देखील पोलीस खात्याकडून एक तारखेला काहीतरी कोरेगाव भीमा येथे होईल असं सांगण्यात आलं आणि तरीही हे सगळं घडलं. त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहिती कमिशनपुढे अजूनही आली नाही. ही माहिती गोळा करावी अशी साक्ष माझी झाली आहे. त्यावेळेसचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक त्यांना पुन्हा साक्षीला बोलावण्यात यावं असं झालं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष होणे देखील महत्त्वाच आहे