एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : संवेदनशील विषयावर आंदोलन करत असताना लाठीचार्ज करणे चुकीचे, प्रकाश आंबेडकर बदलापूर प्रकरणावरुन पोलिसांवर संतापले

Prakash Ambedkar On Badlapur Case : "कुठल्या विषयावर लाथीचार्ज करावा आणि कुठं करू नये यावर शासनाने  नियम केला पाहिजे. लोक अत्याचाराविरोधात आंदोलन करत होते, रेल्वे बंद झाल्यामुळे लोकांना त्रास झाला, पण अशा संवेदनशील विषयावर पोलिसांनी लाठीचार्ज आणि शासनाने लाठीचार्ज करायला सांगणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहे."

Prakash Ambedkar On Badlapur Case : "कुठल्या विषयावर लाथीचार्ज करावा आणि कुठं करू नये यावर शासनाने  नियम केला पाहिजे. लोक अत्याचाराविरोधात आंदोलन करत होते, रेल्वे बंद झाल्यामुळे लोकांना त्रास झाला, पण अशा संवेदनशील विषयावर पोलिसांनी लाठीचार्ज आणि शासनाने लाठीचार्ज करायला सांगणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहे. शासन आणि पोलीसांचा निषेध करतो", असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. बदलापूर येथील आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

लोकांसोबत व्यवस्थित डायलॉग झाला असता तर हे शांतता राहिली असती

प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशात हेटरेटमुळे समाज गुन्हेगारी करायला लागला आहे. त्याचेच हे परिणाम आहे, संस्था स्वतः देश आणि पॉलिटिकल पार्टी यांनी संयम आणि शांतता करायला पाहिजे. दुर्दैवाने आरएसएस बजरंग दल आणि भाजप तिन्ही पक्ष वायलंसचा प्रसार करत आहे.  आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्यावर सुरक्षा करणे हे पोलिसांचा काम आहे. पण आंदोलकांना शांत कस करायच हे ही पोलीसांच काम आहे. लोकांसोबत व्यवस्थित डायलॉग झाला असता तर हे शांतता राहिली असती. या सगळ्याचा अभाव या ठिकाणी दिसून आला. म्हणून लाठीचार्ज झाला, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 

बदलापूर प्रकरणात देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर, 3 मोठे निर्णय घेतले

बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग (Arti Singh) यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. ते नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलत होते. 

फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. संवेदनशीलतेने पोलिस परिस्थिती हाताळत आहेत. ही घटना उघडकीस आल्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. तथापि कुठे काही विलंब असेल तर एसआयटी त्याची चौकशी करेल आणि त्यात दोषी आढळणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

इतर महत्वाच्या बातम्या 

Devendra Fadnavis : बदलापूर प्रकरणात देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर, 3 मोठे निर्णय घेतले

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil: 'सरकार मनोज जरांगेंपुढे पायघड्या घालतंय, एक दिवस उपोषणाला बसले की...'; विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका
'सरकार मनोज जरांगेंपुढे पायघड्या घालतंय, एक दिवस उपोषणाला बसले की...'; विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget