एक्स्प्लोर

ॲड. प्रकाश आंबेडकर करणार आज मोठी घोषणा! ट्वीट करत दिली माहिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Prakash Ambedkar: ऍड प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेणार असून वंचित बहुजन आघाडी पक्षाचा एक व्हिडिओ ही X समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhjinagar: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) हे आज मोठी घोषणा करणार आहेत. यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे ट्विट करत त्यांनी सांगितले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का? राजकारणात या घोषणामुळे मोठी उलथापालट होणार का ? प्रश्नांना यामुळे उधाण आले आहे.

विधानसभेची तयारी की राजकीय उलथापालथ?

विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यातील पक्षांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. कुठे कोणता उमेदवार द्यायचा यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मी आज मोठी घोषणा करणार असल्याचे ट्विट केले आहे.

पत्रकार परिषदेबाबत केले ट्विट

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली जाणार आहे का? नक्की या घोषणेचा उद्देश काय असणार? अशा चर्चा रंगल्या आहेत. यासाठी शहरातील सुभेदारी विश्रामगृहात ऍड प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेणार असून वंचित बहुजन आघाडी पक्षाचा एक व्हिडिओ ही X समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आला आहे.

I will be making a BIG announcement today.

Press Conference at Subedari Government Guest House in Aurangabad.

See you at 4 PM. https://t.co/a9I8zXYPnH
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 16, 2024

विशाळगडप्रकरणी ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले..

विशालगडावर (Vishalgad) आधीपासून लोक होते त्यांनी अतिक्रमण केलं आहे, पण अतिक्रमण काढण्याचे पण नियम आहेत. तुम्हाला ते लगेच काढता येत नाही, तसा प्रस्ताव दिल्यास ते शक्य आहे. संभाजीराजे (Sambhaji raje) आंदोलन करत असताना जो काही प्रकार घडला आहे, आमच्या माहितीप्रमाणे संभाजी भिडे यांचे जे सैन्य आहे, धारकरी आहेत त्या धारकांनी तिथे धुडगूस घातला, अशी आमची माहिती आहे. जाणून-बुजून तेथील लोकांना मारझोड करण्यात आली आणि दुकान तोडण्यात आली. एक तंग वातावरण तिथे तयार करण्यात आलं. सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण? होते याचा शोध घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली.

अससुद्दीन ओवेसेंनीही घेतला विधानसभेचा आढावा

छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी एमआयएमचे खासदार असुद्दिन ओवेसी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून १३ जुलै रोजी आढावा बैठक घेतली होती. कुठे निवडणूक लढवू शकतो ? कुठे कोणता उमेदवार देता येईल ? याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा:

" जरांगेंची इज्जत करतो, त्यांच्यामुळे 8 खासदार निवडून आले, पण .." असदुद्दीन ओवेसींनी घेतला विधानसभेचा आढावा

Prakash Ambedkar on Vishalgad Violence : संभाजीराजेंच्या आंदोलनावेळी संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांनी धुडगूस घातला, सरकारने चौकशी करुन दंगलखोरांचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : हिंदू - मुस्लिमांमध्ये भांडणं लावणाऱ्या भाजपने सांगावं की हिंदूत्ववाद सोडला...Uddhav Thackeray on Saugat-e-Modi : बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगाते मोदी देणारShivsena Uddhav Thackeray PC : भाजपने हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं, ठाकरेंची सडकून टीकाNashik Trimbakeshwar Kumbhकुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा?साधूमहंतांचं म्हणणं काय?Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
Embed widget