(Source: ECI/ABP News/ABP Majha)
" जरांगेंची इज्जत करतो, त्यांच्यामुळे 8 खासदार निवडून आले, पण .." असदुद्दीन ओवेसींनी घेतला विधानसभेचा आढावा
Asaduddin Owaisi on Manoj Jarange: विधानसभा निवडणूकीच्याा आधी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी मनोज जरांगेंचा प्रस्ताव आला तर नक्की बोलू असंही ते म्हणालेत.
Asaduddin Owaisi on Manoj Jarange: "मी जरांगे यांची इज्जत करतो.त्यांच्यामुळे आठ खासदार निवडून आले, पण एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही, असं म्हणत खासदार असुद्दिन ओवेसी यांनी आपला उमेदवार निवडून न आल्याचा खेद व्यक्त करत विधानसभेचा आढावा घेतला
विधानसभा निवडणुकीपूर्वी एमआयएमचे खासदार असुद्दिन ओवेसी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून आढावा बैठक घेतली. कुठे निवडणूक लढवू शकतो ? कुठे कोणता उमेदवार देता येईल ? याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
मी जरांगे यांची इज्जत करतो , पण..
मी मनोज जरांगे यांची इज्जत करतो आणि त्यांचा अभिनंदन करतो. जरांगेंमुळे आठ खासदार निवडून आले. पण एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. सर्व समाजाचे उमेदवार जिंकतात पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाही. जलील निवडून आले नसल्याने महाराष्ट्रातील मुस्लिम समाजात राग आहे. असे खासदार ओवेसी म्हणाले.
मुस्लिम समाजाने जरांगे कडून शिकावं- असदुद्दीन ओवेसी
मुस्लिमांनी सर्वांना मतदान केलं मग ते आम्हाला का मतदान करत नाहीत यावर मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे. जरांगे यांच्याकडून मुस्लिम समाजाने शिकावं असं म्हणत जरांगेंकडून बोलणं होत असेल तर आम्हीही बोलायला तयार आहोत असे एमआयएम खासदार असुद्दिन ओवेसी म्हणाले.
मनोज जरांगे यांचा प्रस्ताव आला तर...
मनोज जरांगे यांच्याकडून जर प्रस्तावाला तर पत्रकारांना सोबत घेऊन जाऊन त्यांच्याशी चर्चा करेन. जरांगेंच्यामुळे बीडमधून पंकजा मुंडे पडल्या. त्यांना विजय मिळत आहे मग मुस्लिम का जिंकत नाही? असा सवाल करत मनोज जरांगे यांचा प्रस्ताव आला तर नक्की बोलू, असे म्हणत ओवेसींनी हात पुढे केला आहे.
मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली जात नाही फक्त..
मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली जात नाही,फक्त मत घेण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीत जिंकून आलेल्या उमेदवारांमध्ये मुस्लिम आणि दलित समाजाच्या मतांचाही मोठा सहभाग आहे असं ते म्हणाले.
महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिला जात नाही. आमचा एक उमेदवार होता , त्यालादेखील सर्वांनी मिळून हरवलं आहे. आम्ही सर्वांना मत दिले पण आमचा उमेदवार पडला. असे ओवेसी म्हणाले.
प्रकाश महाजनांवर ओवेसी बरसले
ज्यांनी लग्न केलं नाही आणि लिव्ह इनमध्ये राहतात त्यांनाही आता योजनेचा लाभ मिळेल. सांगणारा ही वेडा आहे असं म्हणत मोदी यांना सहा भाऊ असून त्यांच्या मनात फक्त द्वेष असल्याचं म्हणत ओवेसींनी प्रकाश महाजनांवर जोरदार टीका केली.
संपूर्ण लोकसभेत 1 मर्द जलील उभे होते
संपूर्ण लोकसभा निवडणुकीत एक मर्द जलील उभे होते. त्यांना पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. आम्ही जिंकण्यासाठी लढतो कुणाला पाडण्यासाठी नाही असे म्हणत मोदी पंतप्रधान झाल्यापासून दहा मुस्लिम लोकांचे मोब बेंचिंग झालं आहे. मुस्लिम संकटात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.