एक्स्प्लोर
चंद्रपूर वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्त अन् सरकारमधील बैठक अनिर्णित; आंदोलक तीन दिवसांपासून चिमणीवर
चंद्रपूर येथील प्रकल्पग्रस्त आणि आंदोलक यांच्यातील चर्चा अनिर्णित राहिली आहे. त्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील चिमणीवर सुरू असलेले आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. चिमणीवरील आंदोलकांना उतरवण्यासाठी CISF ने प्रयत्न सुरू केले आहे.
चंद्रपूर : वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्त आणि सरकार यांच्यातील नागपुरात आयोजित बैठक अनिर्णित राहिल्याने आंदोलक अजूनही चिमणीवर बसून आंदोलन करत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील तणाव अजूनच वाढलाय. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून नागपूर येथे झालेल्या बैठकीत 'आधी आंदोलकांनी चिमणी खाली उतरावे नंतरच पुढील चर्चा करू' अशी सरकारने अट घातली. पण प्रकल्पग्रस्तांनी 'आधी निर्णय घ्या मग उतरू' अशी भूमिका घेतली.
प्रकल्पग्रस्तांच्या या भूमिकेमुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत संतापले आणि मीटिंग सोडून निघून गेले. तेव्हापासून सरकारच्या निरोपाची वाट पाहत प्रकल्पग्रस्तांचे 5 प्रतिनिधी नागपूर येथील ऊर्जा अतिथीगृहा बाहेर थांबून आहे. दरम्यान थर्मल पॉवर स्टेशनच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या CISF ने या आंदोलकांना चिमणी वरून खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. बुधवार सकाळी 8.30 वाजतापासून 140 मीटर उंचीवर हे आंदोलन सुरू आहे. या चिमणीची एकूण उंची 275 मीटर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या वीज केंद्रामुळे 561 प्रकल्पग्रस्त नोकरीत घेण्याचे शिल्लक असून पूर्वपरीक्षा न घेता थेट नौकरीत समाविष्ट करण्याची त्यांची मागणी आहे.
एकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा 'शॉक', बिलात सूट देण्याची मागणी
काय आहे प्रकरण?
चंद्रपूर येथील CISF ची सुरक्षा भेदून महाऔष्णिक वीज केंद्रातील चिमणीवर 8 प्रकल्पग्रस्त चढल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर वीज केंद्रासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास कमालीचा विलंब होत असल्यानं हे प्रकल्पग्रस्त वीज केंद्रातील चिमणीवर चढून आंदोलन करीत आहेत. वीज केंद्रातील नऊ क्रमांकाच्या संचाच्या चिमणीवर हे आंदोलक चढले असून यात पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. वीज केंद्रासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. मोबदल्यात एक स्थायी नोकरी देण्याचा करार वीज कंपनीने केला होता. मात्र, अनेक वर्षे उलटूनही नोकऱ्या देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळं प्रकल्पग्रस्तांनी ही विरुगिरी केली. हा संपूर्ण परिसर सीआयएसएफच्या संरक्षणात आहे. तरीही हे आंदोलक चिमणीवर चढल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
Tiger Sterilizing | कोणाच्या सुपीक डोक्यात वाघांच्या नसबंदीची कल्पना आली? : सुधीर मुनगंटीवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement