एक्स्प्लोर

एकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा 'शॉक', बिलात सूट देण्याची मागणी

महावितरणच्या वाढीव बिलाबाबत राज्यभरात अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. आता याचा फटका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही बसला आहे.

जळगाव : महावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. आता याचा फटका भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही बसला आहे. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी आता राज्य सरकारकडे केली आहे. एकनाथ खडसे यांना एक लाख चार हजार इतके बिल आले आहे. हे बिल एप्रिल ते जुलै असं चार महिन्यांचं आहे. घराचे वीजबिल एक लाख चार हजार इतके आल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेले लाईट बिल पाहून खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे. महावितरणने बिल पाठवण्याअगोदर ती तपासून पाहायला हवीत. या बिलांमध्ये सवलत द्यायला हवी. सूट द्यायला हवी, असं खडसे यांनी म्हटलं आहे. हे ही वाचा-  शेतात वीज कनेक्शन नसतानाही महावितरणचं लाखांचं बिल या बिलांची तपासणी करा, तसेच सूट द्या. महावितरणने ग्राहकांना विनाकारण वेठीस धरू नये अशी मागणी खडसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. महावितरणच्या वाढीव बिलाबाबत राज्यभरात अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. वीज जोडणी केली नसताना शेतकऱ्याला एक लाखाच्या जवळपास बिल लॉकडाऊन सुरू असताना महावितरण कंपनी कडून वीज जोडणी केलेली नसताना नाशिक जिल्हयातील खामखेडा येथील शेतकऱ्याला तब्बल एक लाखाच्या जवळपास वीज बिल आले असल्याचे समोर आले होते. भाऊसाहेब अहिरराव यांची देवळा तालुक्यातील खामखेडा शिवारात शेत जमीन असून आपल्या शेतातील विहिरीवर विज मिळावी म्हणून त्यांनी 2011 साली महावितरण आपल्यादरी या योजनेअंतर्गत चार हजार आठशे दहा रुपयांचे कोटेशन त्यांनी महावितरणच्या ठेंगोडे येथील कार्यालयात भरले. मात्र नऊ वर्ष उलटून सुद्धा त्याच्या शेतात ना विजेचे खांब उभे राहिले ना वीज तारा ओढल्या गेल्या ना त्यांना विज मिळाली,असे असतांना त्यांना महावितरणकडून लॉकडाऊनच्या काळात वीज वापरली म्हणून महावितरण कंपनीने एवढ्या मोठ्या रकमेचे बिल पाठवून एक प्रकारे शॉकच दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar NEET Student Crime News: NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!
NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Mumbai Students Morcha: मुंबईत पुन्हा विद्यार्थ्यांचा एल्गार! 9 ऑगस्टला भव्य रॅली काढणार, देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचं आवाहन, नेमकं कारण काय?
मुंबईत पुन्हा विद्यार्थ्यांचा एल्गार! 9 ऑगस्टला भव्य रॅली काढणार, देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचं आवाहन, नेमकं कारण काय?
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
Embed widget