एक्स्प्लोर

स्मृतीला म्हटलं होतं, भावा, दोघींनी वर्ल्डकप गाजवायचा: पूनम राऊत

संघात निवड झाली तेव्हा आपण दोघी मराठी मुलींनी विश्वचषक गाजवायचा हे त्याचवेळी ठरवलं होतं. खेळपट्टीवर दोघी मराठीतच बोलत होतो. दोघीही एकमेकींना भावा म्हणूनच बोलवत होतो, अशा एक ना अनेक आठवणी टीम इंडियाची डॅशिंग सलामीवीर पूनम राऊतने 'माझा कट्टा'वर सांगितल्या.

मुंबई: विश्वचषकापूर्वीपासूनच माझं आणि स्मृती मानधनाचं एक विशिष्ट बॉण्डिंग होतं. विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड होण्यासाठी दोघीही एकमेकींना प्रेरणा देत होतो. संघात निवड झाली तेव्हा आपण दोघी मराठी मुलींनी विश्वचषक गाजवायचा हे त्याचवेळी ठरवलं होतं. खेळपट्टीवर दोघी मराठीतच बोलत होतो. दोघीही एकमेकींना भावा म्हणूनच बोलवत होतो”, अशा एक ना अनेक आठवणी टीम इंडियाची डॅशिंग सलामीवीर पूनम राऊतने सांगितल्या.  बालपण ते टीम इंडियात निवड, ड्रेसिंग रुम ते वर्ल्ड कपचं मैदान अशा सर्व विषयावर पूनमने ‘माझा कट्टा’वर दिलखुलास गप्पा मारल्या. मूळची बोरिवलीतील रहिवासी असलेली पूनम राऊत ही भारतीय संघातील महत्त्वाची आघाडीची खेळाडू. विश्वचषकाच्या फायनलमध्ये संपूर्ण टीम कोसळली असताना, एकटी पूनम नेटाने उभी होती. फायनलमध्ये तिच्या 86 धावांमुळे टीम इंडियाला विजयाजवळ पोहोचता आलं. मात्र विजयतिलकापासून टीम इंडिया 9 धावा दूर राहिली. स्मृतीला म्हटलं होतं, भावा, दोघींनी वर्ल्डकप गाजवायचा: पूनम राऊत याबाबत बोलताना पूनम म्हणाली, “इतक्या जवळ येऊन विजय मिळू शकला नाही ही खदखद डोळ्यातील अश्रूंमधून बाहेर आली. आमच्या एका विजयाने महिला क्रिकेट वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचणार होतं. आता सगळं संपलं असं वाटत होतं. मात्र देशवासियांनी आमच्या संघाचं, आमच्या मेहनतीचं आणि आमच्या खेळाचं केलेलं कौतुक पाहून, भारतीय महिला क्रिकेट संघाचं भविष्य निश्चितच उज्ज्वल असल्याचं समजलं”  कपडे धुण्याचं धुपाटणं पहिली बॅट टीव्हीवर क्रिकेट पाहून आवड निर्माण झाली. आई कपडे धुण्यासाठी वापरत असलेल्या धुपाटण्याने क्रिकेटचे फटके मारायला सुरुवात केली. तीच पहिली बॅट ठरली, असं पूनमने सांगितलं. वडिलांचा मोठा पाठिंबा मी धुपाटण्याने एवढं क्रिकेट खेळते, तर मला क्रिकेट खेळायला पाठवा, असं मी वडिलांना सांगितलं. त्यांनीही नकार न देता क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली. माझ्या संपूर्ण क्रिकेट करिअरमध्ये पप्पांचा मोठा पाठिंबा राहिला, असं पूनम म्हणाली. मुलांची गोलंदाजी चोपली मी राहात असलेल्या परिसरात कोणीही मुलगी क्रिकेट खेळत नव्हती. त्यामुळे मला मुलांसोबत क्रिकेट खेळावं लागत असे. मी बॅटिंग करताना जर मुलाच्या गोलंदाजीवर फटके मारले, तर मुलं त्या मुलाला चिडवत असत. मग मी एक एक करुन सगळ्यांचीच गोलंदाजी चोपून काढत असे, असंही पूनमने सांगितलं.  मुलांच्या संघात निवड मुंबईत एकदा विभागवार क्रिकेट संघाची नियुक्ती सुरु होती. त्यावेळी संघात निवड होण्यासाठी तीन पायऱ्या पार करणं महत्त्वाचं होतं. मी त्या तीनही पायऱ्या पार केल्या, मात्र मी मुलगी असल्याने, मुलांच्या संघात निवड होऊ शकली नाही, असं पूनमने सांगितलं.  आईचा विरोध मुलांसोबत क्रिकेट खेळत असल्याने, शेजाऱ्यांमुळे आई मला सतत बोलायची. मात्र मी चांगलं क्रिकेट खेळत असल्याने वडील तिची समजूत काढायचे. विविध स्पर्धांमध्ये मी चांगल्या धावा करु लागले आणि आईचा विरोध मावळत गेला, असं पूनम म्हणाली.  भारतीय संघातून डच्चू एकेकाळी फॉर्म हरवल्यामुळे मला भारतीय संघातून बाहेर बसावं लागलं. मात्र माझ्या प्रशिक्षकांनी मला त्याचं दु:ख कधीही जाणवू दिलं नाही. मी त्याकाळात प्रचंड मेहनत केली, माझ्या फिटनेसकडे लक्ष दिलं, एक एक फटक्याचा सराव 50-100 चेंडू खेळून केला, असं पूनमने सांगितलं.  स्मृतीशी चॅटिंग एकवेळ अशी होती की सांगलीची स्मृती मानधना ही भारतीय संघात होती आणि मी बाहेर होते. त्यावेळी तीचं माझ्या खेळाकडे लक्ष होतं. मी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावा केल्या की स्मृती मला मेसेज करुन, तुला टीम इंडियात परतायचं आहे, अशी प्रेरणा द्यायची, अशी आठवण पूनमने सांगितली. स्लेजिंगचा सामना क्रिकेटच्या मैदानावर स्लेजिंगचा सामना करावा लागतो. महिला क्रिकेटमध्ये त्याचं प्रमाण काहीसं कमी असलं, तरी ते तुमच्या वाट्याला आलं की त्याला तुम्ही कसं रिअॅ क्ट होता, हे महत्त्वाचं आहे. तुमच्याशी कोणी स्लेजिंग करत असेल, तर समोरची व्यक्ती नकारात्मक होत आहे हे लक्षात घ्या. त्याच्या निगेटिव्हिटीमध्ये सामील न होता, त्याला उत्तर न देता शांत तुमच्या खेळीकडे लक्ष द्या, असं पूनम म्हणाली. महाराष्ट्राचा अभिमान विश्वचषकात मी आणि स्मृती आम्ही मराठी मुली भारतासाठी सलामीला उतरतोय याचा अभिमान होता. महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे, असंही पूनमने नमूद केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget