Pooja Chavan Death Case | संजय राठोड यांचा राजीनामा कधी? Special Report
संजय राठोड प्रकरणी शिवसेनेनं 'वेट ॲण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे. पोलिसांचा रिपोर्ट येईपर्यत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच संजय राठोडांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट पडले असल्याची देखील माहिती आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर शिवसेनेत गहन चर्चा सुरु आहे. राजीनाम्याच्या प्रश्नावर पक्षात दोन मतप्रवाह आहे. राजीनामा देण म्हणजे आरोप मान्य करण्यासारखी गोष्ट असल्याचं राजीनाम्याला विरोध करणाऱ्या गटाचं मत आहे. संजय राठोड प्रकरणातून चुकीचा पायंडा पडू नये असं मत अनेकांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडलंय. राजीनाम्याच्या प्रश्नावर अद्यापही कुणाकडेच ठोस माहिती नाही हे मात्र नक्की.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील वानवडी परिसरात पूजा चव्हाण नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. सोशल मीडियावर 'टिक-टॉक स्टार' अशी पूजाची ओळख होती. अशातच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनेक नवनवी माहिती समोर येऊ लागली आहे. अशातच आता भाजपकडून थेट संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.