एक्स्प्लोर

राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात ढवळाढवळ करु नये, गडकरींचा सरकारला घरचा आहेर

राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात ढवळाढवळ करु नये, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला दिला आहे. यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

यवतमाळ : राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात ढवळाढवळ करु नये, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला दिला आहे. यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिले होते. परंतु काही कारणास्तव सहगल यांना संमेलनाला येऊ नये, असे सांगण्यात आले. त्यामुळे देशभरातून राज्य सरकारवर टीका झाली. त्यामध्ये आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भर पडली आहे. साहित्य क्षेत्रात राजकारण्यांनी ढवळाढवळ करु नये, असा सल्ला देत गडकरींनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. गडकरी म्हणाले की, राजकारण्यांनी साहित्य, कला आणि इतर स्वायत्त संस्थांमध्ये हस्तक्षेप करु नये. परंतु त्यांच्यामध्ये आपसांत संबंध असायलाच हवा. लोकशाही आणि स्वातंत्र्याकरता त्याची आवश्यकता आहे. आणीबाणीच्या काळात पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत यांच्या सभांना नेत्यांपेक्षा मोठी गर्दी होत होती. लेखक मंडळींनी त्या काळात समाज प्रबोधन केले. त्यामुळे राजकारणी व साहित्यिकांमध्ये संबंध असणे गरजेचे आहे. गडकरी म्हणाले की, आयोजकांनी वैशाली येडे ताईंना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलावले, हे चांगलं केलं. त्यांनी पुस्तक लिहिले नसेल पण जीवन कसे जगायचे हे त्यानी दाखवून दिले आहे. मराठी भाषेबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, मराठी भाषेचे मोठेपण तुम्हाला त्या दिवसापर्यंत कळणार नाही, जोवर तुम्ही महाराष्ट्र सोडून बाहेर जात नाही. मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी नाटक किती श्रेष्ठ हे बाहेर गेल्यावरच कळेल. छत्रपती शिवाजी महाराजांवरची पुस्तके वाचायची संधी मिळाली नसती तर ते कोण आहेत हे मला कळले नसते. मी त्यांच्या आदर्श घेऊन पुढे येऊ शकलो नसतो. त्यामुळे छत्रपती शिवरायांवरची पुस्तके सर्वांनी वाचायला हवीत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget