एक्स्प्लोर
Advertisement
भ्रष्टाचार उघड करण्याच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार-खासदारांमध्ये जुंपली
नांदेड जिल्ह्यातील भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
औरंगाबाद : भ्रष्टाचार उघड करण्याच्या मुद्द्यावरुन भाजपच्या आमदार आणि खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे ब्लॅकमेलर आहेत, असा आरोप नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केला आहे. तर चिखलीकर भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केलाय. नांदेड जिल्ह्यातील पेनुर-शेवडी-सोनखेड या रस्त्याच्या कामावरुन भाजपच्या बंब आणि चिखलीकर यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. यावर आता पक्ष काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार बंब यांनी नांदेड जिल्ह्यातील पेनुर-शेवडी-सोनखेड या रस्त्याच्या कामाची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. दरम्यान संतापलेल्या चिखलीकर यांनी बंब हेच ब्लॅकमेलर आहेत, त्यांच्या पत्राची दखल घेऊ नका असं म्हटलंय. बंब तक्रार करुन ठेकेदारासोबत तडजोड करतात असा आरोप चिखलीकरांनी केला आहे.
आमदार प्रशांत बंब आरोप काय?
जर कुठे काम निकृष्ट होत असेल तर त्याबाबत तक्रार करण्याचा मला अधिकार आहे. भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून माझ्यावर दबाव टाकला जात आहे. माझ्या जन्माच्या आधीपासून प्रताप पाटील चिखलीकर राजकारणात आहे असं म्हणत असले, तरी ते निकृष्ट कामाबाबत का बोलत नाहीत? रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराबाबत गप्प का? असेही प्रश्नही बंब यांनी यावेळी उपस्थित केले. एकंदरीत सगळ्या कामात तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यासंदर्भात प्रताप पाटील चिखलीकर यांची पक्षाकडे तक्रार करणार असल्याचेही बंब यांनी सांगितले. चिखलीकर यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे असून याबाबतीत त्यांना नोटीस पाठवणार आहे. यावर त्यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे ते म्हणाले. मी कामातील भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यानिशी केले आहेत. त्यांनी मी ब्लॅकमेलर असल्याचा पुरावा द्यावा. मी अद्याप एकही पत्र मागे घेतलेले नाही. कुणी जर खोटं काम करत असेल तर त्याविरोधात तक्रार करण्याचा माझा हक्क असल्याचे बंब यांनी सांगितले.
हेही वाचा - अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नागपुरात 22 हजार हेक्टर शेतीचे नुकसान : जिल्हाधिकारी
प्रताप चिखलीकरांचे आरोप काय?
नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कामात अनियमितता झाली असल्याची तक्रार भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर भाजपचे नांदेडचे खाजदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहुन बंब यांच्या तक्रारीची दखल घेऊन कोणतेही विकास काम बंद करू नये, अशी विनंती केली आहे. चिखलीकर यांच्या विनंतीनंतर आता भाजप आमदार बंब आणि भाजप खाजदार चिखलीकर यांच्या वाकयुद्ध भडकले आहे. यावर एबीपी माझाशी बोलताना चिखलीकर यांनी बंब सर्वत्र तक्रारी करतात आणि त्या तक्रारी का करतात हे सर्वश्रुत असल्याचं म्हणाले. राजकारणात सर्वांनी काही संकेत पाळायचे असतात. बंब यांच्या तक्रारींचा हेतू चांगला असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन अण्णा हजारेंप्रमाणे समाजकार्य करावे, असा सल्लाही दिलाय. नांदेड जिल्ह्यात रस्त्यांची कामं प्रगती पथावर आहेत. मात्र, ब्लॅकमेलर आमदार प्रशांत बंब यांच्याकडून या कामाची तक्रार करण्यात आली आहे. प्रशांत बंब हे अशा तक्रारी करुन ब्लॅकमेलिंगकचं काम करतात. त्यातून विकास कामांना जाणीवपूर्वक अडथळा आणला जातो. त्यांनी अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या कामांची तक्रार केली आहे. मात्र, तक्रारीअंती ते तडजोड करुन संबंधित ठेकेदाराकडून पैसे वसूल करतात, असा आरोप भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement