एक्स्प्लोर

आईला ट्रॅक्टरसमोर टाकणाऱ्या मुलांवर गुन्हा, एकाला अटक, एक फरार

मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावातील ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाशिम :  शेतीच्या वादातून आपल्या जन्मदात्या आईवरच ट्रॅक्टर घातल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. कैलास दळवी आणि अंकुश दळवी यांच्यावर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर लगेच सायंकाळी अंकुश दळवीला पोलिसांनी अटक केली असून, कैलास दळवी हा फरार झाला आहे. मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावातील ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे, पोलिसांनी स्वत:च या घटनेची दखल घेत फिर्याद दिली. प्रकरण काय आहे? वाशिम जिल्ह्यात शेतीच्या वादातून आपल्या जन्मदात्या आईवरच ट्रॅक्टर घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावातील ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाशिममधील मुंगळा गावात गुरुवारी शेतीमध्ये पेरणीच्या वादात दोन गटात तुफान बाचाबाची झाली. 40 वर्षापासून हा शेतीचा वाद सुरु आहे. मुंगळा शिवारात कैलास दळवी हे आपल्या कुटुंबासोबत पेरणी करताना गावातीलच राऊत कुटुंब त्याठिकाणी ट्रॅक्टर घेवून आले. शेती कुणाची आहे यावरुन दळवी आणि राऊत कुटुंबात वाद झाला. यावेळी कैलास दळवी यांनी आपल्या आईलाच ट्रॅक्टरसमोर टाकलं. हा प्रकार इथेच थांबला नाही, तर राऊत कुटुंबांने कैलास दळवी आणि त्यांच्या पत्नीला झाडाला बांधून ठेवले. राऊत कुटुंबांनेदेखील कैलास दळवी यांच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर

आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !

कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार

मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget