एक्स्प्लोर
पुण्यातील बुधवार पेठेत धरपकड, अनेक तरुण ताब्यात
कारवाई दरम्यान अनेक तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बुधवार पेठेतील वेश्या व्यवसायासाठी ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे : पुणे पोलिसांनी आज शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या बुधवार पेठेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान अनेक तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बुधवार पेठेतील वेश्या व्यवसायासाठी ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत ही कारवाई करण्यात आली आहे. बुधवार पेठेतील कारवाई करण्यात आलेल्या वस्तीत मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला राहतात. त्यामुळे तेथील प्रत्येक इमारतीची पोलिसांनी झडती घेतली. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली. या परिसरात येणाऱ्या मुलींचे ओळखपत्र,पॅनकार्ड, वय तपासण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. बुधवार पेठेतील या परिसरात राहणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्र, पॅनकार्ड नसेल त्यांना बुधवार पेठेत राहता येणार नाही. तसेच ज्यांच्याकडे सध्या ओळखपत्र नाहीत त्यांनी दोन दिवसात सर्व कागदपत्रे सादर करावी, तरच त्यांना येथे राहता येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या कारवाईमुळे बुधवार पेठेत येणाऱ्या तरुणांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















