एक्स्प्लोर
नागपुरात जुगाराच्या अड्ड्यावरुन 6 पोलिसांना रंगेहाथ पकडलं
जुगार खेळताना पकडण्यात आलेले हे पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालय आणि शांतीनगर पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आहेत.
नागपूर : पोलिसांनी सिव्हिल लाईन्स परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. या छाप्यात 12 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 6 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
जुगार खेळताना पकडण्यात आलेले हे पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालय आणि शांतीनगर पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आहेत. तसंच ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये तीन सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आणि इतर तीन सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे.
सिव्हिल लाईन्स परिसरात विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ एक जुनी इमारत आहे. या इमारतीत हा जुगार अड्डा सुरु होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे जुगार अड्डे चालवणारा देखील एक सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहे.
दरम्यान सर्व प्रकरणामुळे नागपूर पोलिसांची मान शरमेने खाली गेली आहे. तसंच नागपूर पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रकही जारी केलं आहे. मात्र कोणतेही वरिष्ठ पोलीस अधिकारी याबद्दल बोलायला तयार नाही.
संबंधित बातम्या :
नागपुरात पोलिसांची भाऊ-बहिणीला अमानुष मारहाण
गुंडांसोबत मिळून तोडफोड, नागपुरात पोलीस कर्मचारी निलंबित
मुन्ना यादववरील हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे, नागपूर पोलिसांचा यू टर्न
मुन्ना यादव आमच्यापेक्षाही फास्ट : नागपूर पोलीस
औरंगाबादमध्ये राजरोसपणे हायटेक जुगार, पोलिसांचं दुर्लक्ष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
विश्व
Advertisement