एक्स्प्लोर
गावठी दारु पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला
गावठी दारु पकडण्यासाठी हे दोन्ही पोलिस कर्मचारी गेले असताना, लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळते आहे.

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मांजरखेड येथील तांडा परिसरात पोलिसांवर हल्ल्याची घटना घडली आहे. गावठी दारु पकडण्यासाठी हे दोन्ही पोलिस कर्मचारी गेले असताना, लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
पुणे
छत्रपती संभाजी नगर
पुणे























