एक्स्प्लोर
तंबाखूचा तोबरा भरुन कोर्टात, पोलिसाला खराब भिंती पुसण्याची शिक्षा
न्यायालयाने पोलिस अधीक्षक कार्यालयात कारवाई करण्याची लेखी तक्रार केली आहे. या अहवालानुसार आता अधीक्षक कार्यालयातून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात तंबाखूचं सेवन करणार्या पोलिसाला कोर्टानेच चपराक लगावली. तोंडात तंबाखूचा तोबरा भरुन समोर आल्यामुळे संतप्त न्यायाधीशांनी न्यायालयातील खराब झालेले कोपरे स्वच्छ करण्याची शिक्षा पोलिस हेड कॉन्स्टेबलला दिली.
बबन गेणबाजी साळवे हे पोलिस हेड कॉन्स्टेबल एका खटल्यात साक्षीसाठी आरोपीला घेऊन आले होते. न्यायाधीशांसमोर जाताना त्यांनी तोंडात तंबाखूचा तोबरा भरला होता, त्यामुळे त्यांना बोलणंही अशक्य झालं.
'तोंडात काय आहे?' असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारल्यावर त्यांनी सुपारी असल्याचं सांगितलं. मात्र न्यायधीशांनी इतर पोलिसांना बोलावून पाहणी करण्यास सांगितलं. त्यावेळी पोलिसांनी साळवे यांच्या तोंडात तंबाखू असल्याचं सांगितलं.
घडलेल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या न्यायाधीशांनी त्यांना कोर्टात मावा, तंबाखू आणि गुटखा थुंकल्यामुळे खराब झालेले कोपरे स्वच्छ करण्याची शिक्षा दिली. त्यामुळे साळवे यांनी कोर्टातले अस्वच्छ कोपरे साफ केले.
न्यायालयाने पोलिस अधीक्षक कार्यालयात कारवाई करण्याची लेखी तक्रार केली आहे. या अहवालानुसार आता अधीक्षक कार्यालयातून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
न्यायालयाच्या आवारात धुम्रपान, तंबाखू सेवन करण्यास मनाई आहे. धुम्रपान करुन अस्वच्छता केल्यास तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे, मात्र तरीही सर्रास तंबाखू, मावा आणि गुटखा खाऊन नागरिक थुंकतात. आता न्यायालयानं शिक्षा सुनावल्यामुळे या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement