एक्स्प्लोर

मराठा मोर्चावेळी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचारात राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचा सहभाग?

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी ही माहिती दिली.

पिंपरी : चाकणमध्ये मराठा क्रांती मोर्चावेळी झालेल्या हिंसक आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचं नाव आलं आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचं नाव चाकण हिंसाचाराच्या चौकशीत आलं आहे . एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी  ही माहिती दिली. तसंच याप्रकरणाची चौकशी अजून सुरु आहे. ज्यांचं नाव चौकशीत आलं आहे त्यांच्या हिंसाचारातील सहभागाचे पुरावे तपासले जात असल्याचंही ते पुढे म्हणाले. चाकण हिंसाचारप्रकरणी कारवाई पारदर्शक व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केली. गेल्या वर्षी 30 जुलैला झालेल्या मराठा मोर्चाने अचानक हिंसक वळण घेतलं होतं. यात वाहनांची जाळपोळ, दगडफेक, पोलीस स्टेशनवरही हल्ला झाला होता. याप्रकरणी आत्तापर्यंत दोन हजार आंदोलकांची चौकशी झाली. त्यापैकी पोलीस स्टेशनवर हल्ला करणाऱ्या 108 आंदोलकांना अटक झाली, तर आणखी काहींना कधीही अटक होऊ शकते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा समावेश असू शकतो. चाकण हिंसाचाराच्या चौकशीत दिलीप मोहिते पाटलांचं नाव चौकशीत आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. मोहितेंवर चाकण पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचा संशय आहे. पण कोणाला लक्ष्य न करता, ही कारवाई पारदर्शक व्हावी अशी मागणी अजित पवार यांनी केली. चाकणमध्ये काय घडलं होतं मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मागील वर्षी 30 जुलै रोजी गालबोट लागलं. चाकण बंद दरम्यान मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारात एसटी बसेसची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. तसंच काही ठिकाणी पोलिसांवरही हल्ले करण्यात आले होते. चाकण कोणी पेटवलं चाकणमध्ये मराठा मोर्चाच्यावेळी झालेल्या हिंसक आंदोलनात मागील वर्षी 30 जुलै रोजी आंदोलकांनी पंचवीस ते तीस बसेस जाळल्या. तसंच अनेक वाहनांची तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. चाकण, देवाची आळंदी आणि खेडमध्ये बंद पाळण्यात आला. आंदोलकांनी अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यामुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकावरून जाणाऱ्या अनेक गाड्या यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. नाशिक, औरंगाबाद, मुंबई, अहमदनगर सोलापूर, कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget