एक्स्प्लोर
धुळ्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण, नातेवाईकांचा रास्तारोको
धुळे: धुळ्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीविरोधात विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी रास्तारोको केला. कन्हैय्यालाल ठाकरे असं मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.
18 मार्चच्या मध्यरात्री साक्रीतील पोलिस कर्मचाऱ्यासह एकानं कन्हैयालाल याला दहीवेल इथल्या रुमवर जाऊन बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते आहे. तसंच मारहाणीनंतर कन्हैय्यालाल बेपत्ता झाल्याचाही आरोप करण्यात येतो आहे.
विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी साक्री पोलीस स्टेशन समोर सुरत-नागपूर महामार्गावर अर्धा तास रास्तारोको केला होता. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement