एक्स्प्लोर
पोलादपूर बस दुर्घटना : मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये जाहीर
या दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारकडूनही प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
मुंबई : दापोलीहून महाबळेश्वरला जाणाऱ्या बसचा 28 जुलै रोजी आंबेनळी घाटात अपघात झाला. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रूपये मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली असून, याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रूपये मंजूर केले आहेत.
वर्षासहलीला निघालेली खासगी बस 800 फूट दरीत कोसळून 31 पैकी 30 जणांचा मृत्यू झाला, तर सुदैवाने एक जण बचावला. अपघातग्रस्त सर्वजण दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते.
कोकण कृषी विद्यापीठातील चार अधीक्षक सहलीला गेले होते, त्यापैकी तिघा जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय चार सहाय्यक अधीक्षक, नऊ वरिष्ठ लिपीक, 11 कनिष्ठ लिपीक, एक लॅबबॉय, दोन चालकांचा मृत्यू झाला.
अपघातातून थरारकरित्या बचावलेले प्रकाश सावंत-देसाई खोल दरीतून वर आले. मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला फोन करुन त्यांनी अपघाताची माहिती दिली. सावंत-देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे अधीक्षक आहेत.
या दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारकडूनही प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
EXCLUSIVE LONE SURVIVOR : मी कसा वाचलो, मरणाच्या दाढेतून वाचलेले प्रकाश सावंत देसाईंचा थरार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement