एक्स्प्लोर

घरं बनलं, मग मिठाई का नाही पाठवली, मोदींच्या प्रश्नावर महिला म्हणाली नंदुरबारला या सर!

शिर्डी दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सर्वात आधी मोदींनी नंदुरबारच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी लाभार्थ्यांनी मोदींशी हिंदीतून संवाद साधला. मात्र मोदींनी थेट मराठीतच संवाद साधत, लाभार्थ्यांचं अवघडलेपण दूर केलं.

शिर्डी: शिर्डी दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सर्वात आधी मोदींनी नंदुरबारच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी लाभार्थ्यांनी मोदींशी हिंदीतून संवाद साधला. मात्र मोदींनी थेट मराठीतच संवाद साधत, लाभार्थ्यांचं अवघडलेपण दूर केलं. कसं काय? घरं कसंय? असा प्रश्न मोदींनी विचारला. त्यावर घरकुल मिळालेला लाभार्थी म्हणाला, बरं आहे. घर चांगलं आहे. त्यावर मोदींनी विचारलं, आता तुम्ही प्रसन्न आहात का? तर त्यांना हो म्हणून लाभार्थ्याने उत्तर दिलं. मोदी आणि लाभार्थ्यांमधील संवाद मोदी- कसं काय लाभार्थी - बरं आहे मोदी - काही आज मिठाई केली का? नवीन घर मिळालं, मिठाई वगैरे केली की नाही लाभार्थी - भजन केलं, मिठाई केली. मोदी -  माझ्यासाठी पाठवणार का लाभार्थी - साहेब तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, तुमच्यासोबत टीव्हीवर बोललो तर फार आभाराची गोष्ट वाटते. मोदी - घर कसंय दुसरा लाभार्थी- छान आहे साहेब मोदी - तुम्हाला बरं वाटलं का महिला लाभार्थी – हो मोदी -  मिठाई बनवली, मग मला का नाही पाठवली महिला लाभार्थी - नंदुरबारला या सर.. मोदी -  मी पूर्वी नंदुरबारला खूप येत होतो. नंदुरबारला चौधरींचा चहा…लक्षात आहे काय चौधरींचा चहा….. जेव्हा जेव्हा रेल्वेने जातो तेव्हा तेव्हा चौधरींचा चहा दिला जातो.. असं म्हणत मोदींचा आणि नंदुरबारच्या लाभार्थ्यांचा संवाद पूर्ण झाला. अमरावतीच्या लाभार्थ्यांशी संवाद या वर्षी विशेष दसरा आहे तुमचा. घरकुल मिळालं. कसं वाटतंय, असा प्रश्न मोदींनी विचारला. त्यावर अमरावतीच्या लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. घरकुल मिळवण्यासाठी अर्ज केल्यापासून ते घर मिळेपर्यंत कोणाला लाच द्यावी लागली का, खरं सांगा? असा प्रश्न मोदींनी अमरावतीच्या महिला लाभार्थ्यांना विचारला. त्यावर महिलांनी कोणालाही एक रुपायाही द्यावा लागला नाही असं सांगितलं. त्यावर मोदींनी देशात हाच बदल अपेक्षित असल्याचं सांगितलं. मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विविध जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मोदींच्या हस्ते घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना चावी देण्यात आली.  महाराष्ट्रात अडीच लाख  तयार घरांचं वाटप करण्यात आलं. चार लाख घरं महाराष्ट्रात बांधण्याचं उद्दीष्ट आहे. 2019 पर्यंत टार्गेट पूर्ण करु - मुख्यमंत्री दरम्यान, प्रत्येकाला घराचं मोदींचं स्वप्न महाराष्ट्रात 2019 पर्यंत पूर्ण करु असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.  गरिबांच्या आयुष्यात परिवर्तन करण्याच्या ज्या योजना मोदींनी आणल्या आहेत, त्या सर्वप्रथम महाराष्ट्रात पूर्णपणे लागू करु.  2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचं पंतप्रधानांचं स्वप्न आहे, पण महाराष्ट्रात ते आम्ही 2019 पर्यंतच पूर्ण करु, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget