Sanjay Raut On Narendra Modi : मोदींचा चेहरा एवढा भयंकर, लोकं आता घाबरायला लागले; संजय राऊतांची खोचक टीका
Sanjay Raut On Narendra Modi : जसे शोलेमध्ये बच्चा सोजा वरणा गब्बर आजयेगा, त्याप्रमाणे कधीही टिव्हीवर येतील आणि काहीही घोषणा करतील.
![Sanjay Raut On Narendra Modi : मोदींचा चेहरा एवढा भयंकर, लोकं आता घाबरायला लागले; संजय राऊतांची खोचक टीका PM Narendra Modi face is so terrible People now panic Sanjay Raut On Narendra Modi In Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency Sanjay Raut On Narendra Modi : मोदींचा चेहरा एवढा भयंकर, लोकं आता घाबरायला लागले; संजय राऊतांची खोचक टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/9c328a9eac63ca915ecc760741ab7cb31713000371183737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. 'मोदींचा चेहरा एवढा भयंकर आहे की, आता लोकं घाबरायला लागलेत. कधीही टिव्हीवर येतील आणि काहीही घोषणा करतील, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींना खोचक टोला लगावला आहे. राऊत हे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. दरम्यान, याचवेळी बोलतांना त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस सांगतात आमच्याकडे मोदीसारखा चेहरा आहे. तो एवढं भयंकर चेहरा आहे की, लोकं घाबरायला लागलेत. जसे शोलेमध्ये बच्चा सोजा वरणा गब्बर आजयेगा, त्याप्रमाणे कधीही टिव्हीवर येतील आणि काहीही घोषणा करतील. याला चेहरा म्हणतात ही भुताटकी आहे. हा चेहरा नकोय आता लोकांना, इतकी भयंकर कांड 10 वर्षात केलंय या लोकांनी, असे राऊत म्हणाले.
गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्यांकडून 550 कोटी घेतले...
400 पार लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का?, जनता ठरवेल मोदी ठरवू शकत नाही. मोदींनी 200 जिंकल्या तरी खूप झाल्या. मोदी पुन्हा पंतप्रधान होत नाही ही काळ्या दगडावरील रेघ आहे. नरेंद्र मोदींच्या पक्षाचे जो खाता आहे. त्याची यादी पाहिली तर कत्तलखण्याकडून गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्यांकडून 550 कोटी देणग्या घेण्यात आल्या आहेत, असे राऊत म्हणाले. तसेच, मोदींना काश्मिरी पंडिताच दुःख समजून घेणे गरजेचे वाटले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचे दुःख समजून घेतले नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले.
एक नंबरचं खोटारडा प्रधानमंत्री
ऑलिम्पिक जर खोटं बोलण्याची स्पर्धा लागली, तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल. फेकू चॅम्पियन असून, राष्ट्रीय स्तरावर फडणवीस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी आणि अंपायर म्हणून शाह घ्यावं लागेल. एक नंबरचं खोटारडा प्रधानमंत्री आहे, असेही राऊत म्हणाले.
संभाजीनगरमध्ये विरोधकांना उमेदवार मिळेना...
संभाजीनगरमध्ये खैरेंची हवा सुरू आहे, म्हणून विरोधात उमेदवार मिळत नाही. खैरे हे मनाने पाच वर्ष दिल्लीतच होते. बाळासाहेबांचं इथ प्रेम होते, त्यामुळे इथ शिवसेनेचे खासदार नसणे हे स्वीकारू शकत नाही. आता इथ बसलेला निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचे आदेश पाळतो. मोदी सारखा चेहरा भाजपकडे आहे, पण तो चेहरा भयंकर आहे. इतकं भयंकर कांड या चेहऱ्याने केले आहेत. देशाचं भयंकर नुकसान केलं असल्याचे राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)