एक्स्प्लोर
सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारात अक्षम्य चुका
दिवसेंदिवस सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा वाद वाढत आहे. बुधवारी विद्यापीठाचा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ' असा नामविस्तार करण्यात आला. परंतु विद्यापीठाला दिलेले हे नवे नाव चुकीचे असल्याचे मत अभ्यासकांनी मांडले आहे.

सोलापूर : दिवसेंदिवस सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा वाद वाढत आहे. बुधवारी विद्यापीठाचा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ' असा नामविस्तार करण्यात आला. परंतु विद्यापीठाला दिलेले हे नाव चुकीचे असून ही बाब विद्यापीठाच्या तज्ज्ञांना लक्षात कशी आली नाही? असा सवाल ज्येष्ठ अभ्यासक वा. ना. उत्पात यांनी उपस्थित केला आहे. उत्पात यांच्या सांगण्यानुसार 'अहिल्या' असा केलेला उल्लेख पूर्णपणे चुकीचा असून ऐतिहासिक दस्तावेजात 'अहल्या' असे नाव असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्पात यांनी 'अहिल्या' या शब्दाचा अर्थ सांगितला. ते म्हणाले की, 'आहि' म्हणजे साप आणि 'ला' म्हणजे आणणारी. त्यानुसार अहिल्या म्हणजे 'साप आणणारी' असा नावाचा अनर्थ होतो. खरे नाव हे 'अहल्या' आहे. या शब्दाचा अर्थ 'सूर्यप्रकाश पसरवणारी थोर शक्ती.'
उत्पात म्हणाले की, आजवरच्या सर्व ऐतिहासिक दस्तावेजात अहल्या हेच नाव असून विद्यापीठाने आणि सरकारने अहिल्या असे चुकीचे नाव देत अर्थाचा अनर्थ केला आहे. माधवराव पेशव्यांच्या पत्रातदेखील गंगाजलसमान मातोश्री पुण्यश्लोकी अहल्याबाई असा उल्लेख आढळतो. नामकरणात वापरलेला 'पुण्यश्लोक' हा शब्द पुल्लिंगी असून त्याऐवजी 'पुण्यश्लोकी' असा शब्द असायला हवा.
वाचा : सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी
दरम्यान याबाबत आमदार गणपतराव देशमुख आणि अभ्यासक अण्णा डांगे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगत आता तरी विद्यापीठाने ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करून चुकीची दुरुस्ती करुन घ्यावी, अशी मागणी उत्पात यांनी केली आहे.
VIDEO
सुरुवातीला लिंगायत समाजाने या नामविस्तारास आक्षेप घेतला होता. विद्यापीठाचे सिद्धेश्वर असे नामकरण करण्याची मागणी लिंगायतांनी केली होती.
वाचा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, नामविस्तार कार्यक्रमात धनगर कार्यकर्त्यांच्या गोंधळ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
