एक्स्प्लोर

सरकार निवडणुकीत व्यस्त, तूर, कांदा उत्पादक त्रस्त

उस्मानाबद : राज्य सरकार निवडणुकीत व्यस्त झाल्याने शेतकऱ्यांचे तूर खरेदी करण्यासाठीची रिकामी पोती संपली आहेत. आवक वाढल्यानं गोदाम फुल्ल झाली आहेत. ज्यांनी महिनाभरापूर्वी तूर विकली त्या शेतकऱ्यांचे पैसे लटकले आहेत. नाशिकमध्ये कांदा परराज्यात पाठवण्यासाठी रेल्वे रॅक उपलब्ध होत नसल्यानं नांदगावात व्यापाऱ्यांनी बेमुदत कांदा मार्केट बंद केलं आहे. येवल्यातल्या एका शेतकऱ्यांना पाच एकर कांदा पेटवून दिला. निवडणुकांमुळे सरकार जागेवर नाही. राज्यभरातल्या सुमारे 1 हजार तूर खरेदी केंद्रावरचा बारदाणा संपला आहे. माल खरेदी करण्यासाठी पोतीच शिल्लक नाहीत. खरेदी केंद्रावर तुरीचे ढिग लागले आहेत. तूर खरेदी केंद्र सरकारने जाहीर न करताच बंद झाली आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांची कुलूप ठोकलं आहे. व्यापारी तुरीची हमी भावापेक्षा कमी दरानं खरेदी करत होते. म्हणून निवडणुकांच्या तोंडावर फडणविसांनी ठरवलं, सरकार 5 हजार 50 दरानं तूर खरेदी करेल. पण त्यासाठीचं नियोजन निवडणुकांमुळे कोलमडलं आहे. गावखेड्यात सरकारविरोधी वातावरण तयार झाल आहे. सुरेश माने आणि नानासाहेब कदम यांनी महिनाभरापूर्वी सरकारला तूर विकली होती. व्यापाऱ्यांना तूर विकली असती, तर लिलाव होऊन 24 तासात पैसे मिळाले असते. पण सरकारला तूर विकून महिना उलटला, तरी नानासाहेब आणि सुरेशसारख्या हजारो शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. मराठवाड्यात तूर, नाशिकमध्ये कांद्याचं पीक जोमात आलं आहे. लगेच दर पडले. नाशिक जिल्ह्यातून कांदा परराज्यात पाठवण्यासाठी रेल्वेने रॅक दिले नाहीत. कांदा साठवण्यासाठी व्यापाऱ्यांकडे जागा शिल्लक नाही. त्यामुळे नांदगाव बाजार समितीनं कांदा मार्केट बेमुदत बंद केलं आहे. कांदा काढणीचाही खर्च निघत नसल्याने येवला तालुक्यातल्या नगरसुलच्या कृष्णा डोंगरेंनी पाच एकरातला कांदा काल शेतात ठिकठिकाणी आग लावून पेटवून दिला. डोंगरेंचा कांदा जळत होता. त्याचवेळी सरकार, त्यांचे मित्र, सरकारचे विरोधक असे सर्वजण निवडणुकीत व्यस्त होते. नेत्यांची हेलिकॉप्टर्स आकाशातून भिरभिरत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget